Yezdi Roadster, Scrambler आणि Adventure बाईक्स भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Yezdi नावाच्या ब्रँडने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात पुनरागमन केले असून, त्यांनी गुरुवारी त्यांच्या तीन नव्या बाईक्स लाँच केल्या आहेत. येझदी रोडस्टर (Yezdi Roadster), येझदी स्क्रॅम्बलर (Yezdi Scrambler) आणि येझदी अॅडव्हेंचर (Yezdi Adventure) अशी त्यांची नावे आहेत.

Yezdi Roadster, Scrambler आणि Adventure बाईक्स भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Yezdi motorcycle

मुंबई : Yezdi नावाच्या ब्रँडने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात पुनरागमन केले असून, त्यांनी गुरुवारी त्यांच्या तीन नव्या बाईक्स लाँच केल्या आहेत. येझदी रोडस्टर (Yezdi Roadster), येझदी स्क्रॅम्बलर (Yezdi Scrambler) आणि येझदी अॅडव्हेंचर (Yezdi Adventure) अशी त्यांची नावे आहेत. या बाईक्स ऑफ-रोड प्रवास करणाऱ्या लोकांना आकर्षित करतील, याचा कंपनीला विश्वास आहे. बरेच लोक अशा गाड्या घेऊन लेह लडाख सारख्या ठिकाणी जाणं पसंत करतात. या बाईकची सुरुवातीची किंमत 1.98 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.

येझदीने आजपासून आपल्या तिन्ही बाईक्स बाजारात सादर केल्या आहेत, त्या भारतातील सर्व डीलर्सपर्यंत पोहोचल्या आहेत. येझदीने सांगितले की, ते विक्रीसाठी सध्या जावाचे शोरूम वापरणार आहे, ज्याचे नुकतेच जावा येझदीच्या शोरूममध्ये रूपांतर झाले आहे. या बाईक्सची विक्री करण्यासाठी कंपनी जावाच्या 300 डीलरशिपचा वापर करणार आहे.

महिंद्रा ग्रुपच्या मालकीची फर्म क्लासिक लीजेंड्सने येझदी भारतीय बाजारपेठेत परत आणली आहे. आधी Jawa आणि नंतर BSA मोटरसायकल ब्रँड लाँच करण्यात आला आहे.

26 वर्षांनंतर पुनरागमन

येझदी ब्रँड्स भारतीय मोटारसायकल बाजारात तब्बल 26 वर्षांच्या कालावधीनंतर येझदी रोडस्टर, स्क्रॅम्बलर आणि अॅडव्हेंचर या तीन मोटरसायकली सादर करत आहे. याआधी 1996 मध्ये कंपनीने बाईकचे उत्पादन बंद केले होते.

येझदी रोडस्टरची फीचर्स

YEZDI ROADSTER च्या फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास यात ड्युअल कार्डले चेसिस आहे. त्याचे वजन 184 किलोग्रॅम आहे. बाईकचा व्हीलबेस 1440 मिमी आहे. त्याची ग्राउंड क्लीयरन्स 175 मिमी आहे. यामध्ये पुढील चाक 18 इंच आणि मागील चाक 17 इंच आहे. जावा मोटरसायकलमध्ये सादर करण्यात आलेल्या येझदीला पॉवर 334 सीसी इंजिन देण्यात आले आहे. यात सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड युनिट देण्यात आले आहे.

YEZDI SCRAMBLER ची खासियत

येझदीची दुसरी बाईक स्क्रॅम्बलर आहे. ही एक उच्च श्रेणीतील बाईक आहे आणि तिचे अनेक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन रोडस्टरशी जुळतात. या बाईकला एलईडी हेडलाईट, टेल लाईट देखील मिळेल, ज्यात टर्न इंडिकेटर देखील असतील. यात राउंड शेप डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, याच्या हँडलबारवर USP Type C चा चार्जिंग पोर्ट मिळेल.

येझदी Adventure चे फीचर्स

आज लाँच झालेली अॅडव्हेंचर ही येझदीची तिसरी बाईक आहे. या बाईकमध्ये अधिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी हेडलाईट युनिट्स कव्हरसह येतात. तसेच, या बाईकला एलसीडी डिजिटल डिस्प्ले मिळेल, जो रायडर्स त्यांच्या उंचीनुसार अॅडजस्ट करू शकतात.

इतर बातम्या

1.58 लाखांची बजाज Bajaj Pulsar अवघ्या 50 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

बहुप्रतीक्षित Simple One Electric Scooter च्या वितरणाची तारीख ठरली, कंपनीला 30000 हून अधिक ऑर्डर्स

सिंगल चार्जमध्ये 250KM रेंज, इलेक्ट्रिक क्रूझर बाईक या महिन्यात बाजारात

(Yezdi Roadster, Scrambler and Adventure Bike Launch, Know about their Price and Features)

Published On - 5:40 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI