आता चाचणीशिवाय Driving Licence मिळणार, परिवहन विभागाचा मोठा निर्णय

परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यताप्राप्त वाहन चालक प्रशिक्षण केंद्रांसाठी नियम अधिसूचित केले आहेत. या केंद्रांवर उमेदवारांना उच्च दर्जाचे वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

आता चाचणीशिवाय Driving Licence मिळणार, परिवहन विभागाचा मोठा निर्णय
Driving Licence
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 11:06 PM

नवी दिल्ली : परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यताप्राप्त वाहन चालक प्रशिक्षण केंद्रांसाठी नियम अधिसूचित केले आहेत. या केंद्रांवर उमेदवारांना उच्च दर्जाचे वाहन चालवण्याचे प्रशिक्षण आणि शिक्षण दिले जाईल. यामध्ये चाचणीतील यशस्वी उमेदवारास ड्रायव्हिंग लायसन्स घेताना पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही, त्यांना त्यातून सूट देण्यात येईल. (You may soon get a Driving Licence without any test at RTO)

मंत्रालयाने म्हटले आहे की, या केंद्रांमध्ये प्रशिक्षणासाठी सर्व सुविधांसह ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक असेल, जेणेकरुन उमेदवारांना उच्च प्रतीचे प्रशिक्षण दिले जाईल. मंत्रालयाने म्हटले आहे की मोटार वाहन अधिनियम, 1988 अंतर्गत या केंद्रांवर ‘रेमिडियल’ आणि ‘रीफ्रेशर’ अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

मंत्रालयाने मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांसाठी अनिवार्य नियम अधिसूचित केले आहेत. हे नियम 1 जुलै 2021 पासून लागू होतील. या केंद्रांवर प्रवेश घेणार्‍या उमेदवारांना पुरेसे प्रशिक्षण व माहिती उपलब्ध करुन दिली जाईल. या केंद्रांवर घेण्यात येणारी परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या उमेदवारांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज भासणार नाही.

मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, अशा मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रांकडून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर वाहन चालकांना वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यास मदत होईल. याचा अर्थ असा की, आता परवाना घेण्यापूर्वी तुम्हाला परीक्षा देण्यासाठी बाइक किंवा कार न्यावी लागणार नाही किंवा चूक झाल्यास तुम्हाला चाचणी घेणाऱ्या अधिकाऱ्याला विनंती करावी लागणार नाही.

यामध्ये केवळ त्याच ड्रायव्हिंग टेनिंग सेंटर्सना मान्यता दिली जाईल जे जागा, ड्रायव्हिंग ट्रॅक, आयटी आणि बायोमेट्रिक प्रणाली आणि निर्धारित अभ्यासक्रमांनुसार प्रशिक्षण आवश्यकता पूर्ण करतील. एकदा प्रशिक्षण केंद्राद्वारे प्रमाणपत्र दिल्यानंतर ते संबंधित मोटार वाहन परवाना अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतील.

इतर बातम्या

भारतात धुमाकूळ घालण्याऱ्या कारची पाकिस्तानकडून कॉपी, चिनी कंपनीकडून विक्री

पावसाळ्यात आपल्या बाईकची अशी घ्या काळजी, या 5 महत्वाच्या गोष्टींची करा तयारी

गुड न्यूज! Yamaha बाईक्सच्या किंमतीत 19,300 रुपयांची घट, जाणून घ्या नव्या किंमती

(You may soon get a Driving Licence without any test at RTO)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.