VIDEO : तणावपूर्ण अयोध्येत शिवसेैनिकांनी बंदुका नाचवल्या

अयोध्या (लखनऊ): शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यामुळे संपूर्ण अयोध्या तणावात आहे. 1992 मध्ये झालेला हिंसाचार विसरला जात नाही. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे स्थानिक मुस्लिम नागरिक काहीसे भयभीत आहेत. असं असताना काही शिवसैनिकांनी थेट हातात बंदुका घेऊन घोषणाबाजी केली. हे शिवसैनिक महाराष्ट्रातील आहेत की उत्तर प्रदेशातील हे कळू शकलेलं नाही. पण …

VIDEO : तणावपूर्ण अयोध्येत शिवसेैनिकांनी बंदुका नाचवल्या

अयोध्या (लखनऊ): शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यामुळे संपूर्ण अयोध्या तणावात आहे. 1992 मध्ये झालेला हिंसाचार विसरला जात नाही. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे स्थानिक मुस्लिम नागरिक काहीसे भयभीत आहेत. असं असताना काही शिवसैनिकांनी थेट हातात बंदुका घेऊन घोषणाबाजी केली. हे शिवसैनिक महाराष्ट्रातील आहेत की उत्तर प्रदेशातील हे कळू शकलेलं नाही. पण अतिशय संवेदनशील वातावरण असताना, शिवसेनेची ही स्टंटबाजी धाकधाकू वाढवणारी आहे. हातात बंदुका नाचवणारे कोण याचा शोध शिवसैनिकांनीच घ्यावा, असं आवाहन आता करण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दुपारी दीडच्या सुमारास उत्तर प्रदेशातील फैजाबाद विमानतळावर दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या स्वागताला अनेक शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकांनी गर्दी केली. ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरे दुपारी बाराच्या सुमारास मुंबईतून अयोध्येच्या दिशेने निघाले. सुमारे दीड तासात ते फैजाबादमध्ये पोहोचले. त्यानंतर ते सहकुटुंब आधी पंचवटी हॉटेलमध्ये गेले. तिथून ते तीनच्या सुमारास कार्यक्रमाला रवाना होतील.
त्यापूर्वी दीड दिवसाच्या प्रवासानंतर शिवसैनिक शुक्रवारी रात्री अयोध्येत दाखल झाले. जय श्रीरामच्या घोषणा देत शिवसैनिक रामजन्मभूमीवर दाखल झाले. शिवसैनिकांनी जय श्री रामच्या घोषणांनी स्टेशन परिसर दणाणून सोडला. मुंबईहून गेलेल्या ट्रेनमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त शिवसैनिक आहेत. तर नाशिकहून निघालेल्या ट्रेनमध्येही एवढेच किंवा यापेक्षा जास्त शिवसैनिक आहेत. नाशिकहून निघालेली ट्रेन अयोध्येत पोहोचण्यासाठी उशिर झाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *