AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2022: दिल्लीत कोव्हिड प्रतिबंधामुळे 70 टक्के व्यापार बुडाला, आता निर्बंधात सूट द्या; कॅटचं नायब राज्यपालांना पत्रं

कोव्हिड प्रतिबंधांमुळे दिल्ली आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये रिटेल व्यापार गेल्या 25 दिवसांमध्ये 70 % कमी झाला आहे. ही चिंताजनक परिस्थिती आहे असे कॅटने म्हटले आहे.

Budget 2022: दिल्लीत कोव्हिड प्रतिबंधामुळे 70 टक्के व्यापार बुडाला, आता निर्बंधात सूट द्या; कॅटचं नायब राज्यपालांना पत्रं
70% loss in trade due to covid restrictions, CAT demands sought relief from restrictions to deputy governor
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 7:05 PM

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोव्हिड प्रतिबंधक (coronavirus) नियमांमध्ये सूट देण्याच्या निर्णयावर दिली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांची 27 जानेवारीला महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या अनुषंगाने कॉन्फेडरेशन ऑफ आल इंडिया ट्रेडर्स (कैट) यांनी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल (Delhi LG Anil Baijal)यांना 26 जानेवारीला पत्र लिहले. दिल्लीमध्ये कॅटने (CAT) करोनाबाधितांची संख्येत घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये करोना प्रतिबंधक निर्बंधात सूट द्यायला हवी असे कैटने पत्रात नमूद केले आहे. यामुळे दिल्लीमध्ये व्यापार आणि आर्थिक व्यवहार पुन्हा वेग पकडतील. कॅटनुसार गेल्या 25 दिवसात दिल्ली आणि संपूर्ण देशातच करोना प्रतिबंधांमुळे रिटेल व्यापारात जवळपास 70 % घट झाली आहे. ही चिंताजनक बाब आहे. करोना प्रतिबंधांमुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्याशी खरेदी करणाऱ्यांची संख्या जवळपास नाहीच्या बरोबर आहे. संपूर्ण व्यापारी वर्गावर याचा परिणाम झाला आहे

कॅटने राज्यपालांना सूचवला उपाय

कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी अनिल बैजल यांना पत्राद्वारे काही उपाय सुचवले. दिल्लीमध्ये ज्या व्यक्तीचे लसीकरण झाले नाही. त्या व्यक्तीला घराबाहेर न पडण्याची परवानगी दिली जावू नये. खंडेलवाल यांनी सांगितले की, ऑड-इवन व्यवस्था आणि वीकेंड लॉकडाउन आता बंद करायला हवे. दिल्लीचे बाजार सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंतच सुरू रहायला हवे. दिल्लीमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि ठाणे पोलीस इंन्चार्ज यांची संयुक्त बैठक घ्यावी. जेणेकरुन त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत करोना नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. कैटने उपराज्यपाल सुचवलेल्या पर्यायामध्ये लग्नाविषयी उपाय सुचवले आहेत. दिल्लीमध्ये लग्नकार्य आवश्यक आहेत. अशावेळी 20 व्यक्तींऐवजी 100 लोकांना लग्नकार्यात सहभागी होण्याची परवानगी असावी. तसेच जेवणाची व्यवस्था करणाऱ्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट 50 टक्केच्या क्षमतेने खुले करण्याची परवानगी द्यावी. लसीकरण न झालेल्या व्यक्तींना मात्र लग्न आणि हॉटेल -रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला जावा.

कोव्हिड प्रतिबंधांमुळे नुकसान

खंडेलवाल यांनी सांगितले की, कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमावलीने दिल्लीतील व्यापाराचे 70 % नुकसान झाले. यामध्ये एफएमसीजीचे 60 %, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 65%, मोबाइलमध्ये 70 %, दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंमध्ये 60%, सुकामेव्यामध्ये 65%, ठोक किराणामध्ये 60%, फुटवेअरमध्ये 70%, ज्वेलरीमध्ये 55%, खेळण्यात 70%, गिफ्ट आयटमध्ये 80%, बिल्डर हार्डवेअरमध्ये 70%, सँनिटरीवेअरमध्ये 75%, परिधानमध्ये 70%, कपड्यांमध्ये 70%, कॉस्मेटिकमध्ये 60%, फर्निचरमध्ये 75%, फर्निशिंग फँब्रिक्समध्ये 70%, इलेक्ट्रिकल सामानात 70%, सुटकेस व लगेजमध्ये 75% श, खाद्यान्न 45%, होम अप्लायन्सेस 65%, घड्याळांमध्ये 70%, कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरचे सामान यामध्ये 65%, कागद आणि स्टेशनरीमध्ये 70%, मिल स्टोअर आणि मशीनरीमध्ये 70%, लग्न आणि इतर कार्यक्रमाचे कार्डमध्ये 80%, सर्जिकल वस्तूमध्ये 65%, रबर आणि प्लास्टिकमध्ये 70%, पाइप आणि पाइप फिटिंगमध्ये 75%, अॉटो पार्टसमध्ये 70%, जुन्या वाहनांच्या विक्रीत 70%, लाकडी आणि प्लायवूडमध्ये 70% घट झाली. देशाची मोठी बाजारपेठ असलेल्या दिल्लीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापारात झालेली घट झाल्याचा परिणाम अन्य राज्यांवरही झाला. करोनापासून सुरक्षा हवी. पण व्यापार आणि आर्थिक व्यवहार पूर्ववत झाले पाहिजे असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

budget 2022 | 28 फेब्रुवारीला सादर केला जाणारा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होऊ लागला! यामागचं लॉजिक काय?

Budget Expectations 2022: अर्थसंकल्पातून MSMEच्या नेमक्या अपेक्षा काय?; कराचे ओझे खरंच कमी होणार?

Budget 2022 : आरोग्य विम्यात 80D अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर सवलत?…तर विम्यावरील जीएसटीही 5% पर्यंत कमी करण्याची मागणी…

गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या
गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या.
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र.
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?.
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं.
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.