अर्थसंकल्पानंतर सोने, चांदी वधारले, सर्वकालीन उच्चांक गाठला

अर्थसंकल्प जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीचे दर वधारले आहे. सोने आतापर्यंतच्या सर्वाधिक पातळीवर पोहचले आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात उसळी झाली आहे.

अर्थसंकल्पानंतर सोने, चांदी वधारले, सर्वकालीन उच्चांक गाठला
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 1:16 PM

नवी दिल्ली : अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या भावाने पुन्हा नवा उच्चांक (Gold at Record High) गाठला. भारतीय वायदे बाजारात (Multi Commodity Exchange) सोन्याचा भाव वाढला आहे. अर्थसंकल्पानंतर गुरुवारी सोन्याने (सोने) 700 रुपयांच्या वाढीनंतर सार्वकालिक उच्चांक गाठला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, सोने 779 रुपयांच्या वाढीनंतर 58 हजार 689 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याआधी बुधवारी सोन्याचा भाव 57 हजार 910 रुपयांवर बंद झाला होता.

दुसरीकडे, जर आपण चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारात चांदी 1 हजार 805 रुपयांनी महागली आहे. आता चांदी 71 हजार 250 रुपये किलोवर पोहोचली आहे. 1 फेब्रुवारी रोजी चांदीचे दर 69 हजार 445 प्रतिकिलो होते.

का वाढले दर

हे सुद्धा वाचा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अर्थसंकल्पात सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमा शुल्क 20% वरून 25%, चांदीवर 7.5% वरून 15% पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतरच भारतीय बाजारात सोन्याच्या किमती वाढू लागल्या. तसेच केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी वाढली आहे. यामुळे 2023 मध्ये सोने 64,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

वर्षभरात मोठी वाढ

1 फेब्रुवारी 2022 रोजी तो 48 हजार 8 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता, तो आता 58 हजार 689 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या 1 वर्षात त्याची किंमत 10,681 रुपयांनी (20%) वाढली आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.