budget 2021 : अर्थसंकल्पाला सुरुवात होताच शेअर बाजारात आनंद, 800 अंकांनी सेन्सेक्सची उसळी

budget 2021 : अर्थसंकल्पाला सुरुवात होताच शेअर बाजारात आनंद, 800 अंकांनी सेन्सेक्सची उसळी

मुंबई : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळल्याचं पाहायला मिळालं. अशात आज आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पावेळी भाषण करत असताना शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. दिवसाच्या सुरुवातीला आज बाजार 401 अंकांनी वधारला. पण जेव्हा बजेटला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्सने थेट 800 अंकांनी उसळी घेतली. त्यामुळे तो 47,185.75 वर पोहोचला. (budget 2021 sensex surges 899 points currently at 47185 Todays share market news live updates)

खरंतर, प्री-ओपनिंगमध्ये बीएसई आणि एनएसईमध्ये तेजी दिसून आली. सकाळी 9.10 वाजता बीएसई 46,617.95 वर गेला आणि त्याने 332.18 अंकानी (+ 0.72%) तेजी घेतली. तर एनएसईचा व्यवहार 13,758.60 पातळीवर गेला आणि 124 अंकांनी (+ 0.91%) वाढला.

आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ, स्टेट बँक ऑफ इंडियाने आज सुरुवातीपासूनच सलामी दिल्याचं पाहायला मिळालं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 11 वाजता भाषण करण्यास सुरुवात केली, तेव्हा बाजारात तेजी दिसून आली. 11.17 वाजता बीएसई 526 अंकांनी वाढून 46,812.42 वर स्थिरावला, तर निफ्टीचा व्यापार 13,773.25 वर होता.

दरम्यान, 12.02 वाजता शेअर बाजाराने 900 पेक्षा जास्त अंकांची कमाई केली. यावेळी बीएसई 47,204.78 अंकांवर तर निफ्टी 13,889.90 अंकांवर होती. शुक्रवारी बीएसईच्या 30 शेअरवर आधारित प्रमुख सेन्सेक्स 2,592.77 अंक म्हणजेच 5.30 टक्क्यांनी घसरून 46,285.77 वर बंद झाला होता. तर एनएसईच्या 50 शेअरवर आधारित प्रमुख निफ्टीही मागच्चा आठवड्याच्या तुलनेत 737.30 अंकांनी म्हणजेच 5.13 टक्क्यांनी घसरून 13,634.60 वर बंद झाला. या महिन्यात ऐतिहासिक उच्चांपर्यंत पोहोचल्यानंतर सेन्सेक्स जवळपास 4,000 अंकांनी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. तर निफ्टी 1,000 अंकांनी खाली आली आहे.

या शेअर्सवर लक्ष ठेवा

सॅमको सिक्युरिटीजच्या सिनिअर एनालिस्ट निराली शाह यांच्या म्हणण्यानुसार, लार्सन अँड टुब्रो, गेल, एनटीपीसी, इंडियन ऑईल, पीएनसी इन्फ्राटेक, हुडको, डालमिया इंडिया भारतामध्ये तेजी आणू शकतात. यामुळे या शेअर्सवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवा.

या शेअर्सचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होईल फायदा

अर्थसंकल्पात सरकारच्या घोषणांचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेविषयीच्या एफएमसीजी, कृषी आणि संबंधित क्षेत्रांना होण्याची शक्यता आहे. कोरोमंडल इंटरनेशनल, रॅलिस इंडिया, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, डाबर इंडिया, इमामी, हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्सला मोठा फायदा होऊ शकेल.

रिलिगेअर ब्रोकिंगचे व्ही.पी. रिसर्च अजित मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने जर पायाभूत सुविधांवर जोर दिला तर एबीसी इंडियासारख्या असलेल्या सिमेंट कंपन्यांचा साठा आणि ओबेरॉय रिटेल आणि गोदरेज प्रॉपर्टीज सारख्या रिअल्टी कंपन्यांचे शेअर्स मिळू शकतात. इतकंच नाही तर यंदाच्या बजेटमध्ये वाहन कंपन्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी, अशोक लेलँड, बजाज ऑटो, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा यांना फायदा होऊ शकेल. (budget 2021 sensex surges 899 points currently at 47185 Todays share market news live updates)

संबंधित बातम्या –

Union Budget 2021 Marathi LIVE : टॅक्स स्लॅबममध्ये कोणतेही बदल नाहीत, कररचना जशीच्या तशी!

Budget 2021 : अर्थसंकल्पानंतर तुम्हाला किती कर भरावा लागणार? तपासण्यासाठी वापरा ‘हा’ कॅल्क्युलेटर

Stocks to Buy Today: बजेटच्या दिवशी या शेअर्सवर असुद्या लक्ष, बक्कळ वाढेल पैसा

Gold rate today: बजेटआधी सोन्या-चांदीमध्ये मोठी उसळी, 4000 रुपयांनी वाढले भाव; वाचा आजचे दर

(budget 2021 sensex surges 899 points currently at 47185 Todays share market news live updates)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI