Stocks to Buy Today: बजेटच्या दिवशी या शेअर्सवर असुद्या लक्ष, बक्कळ वाढेल पैसा

शुक्रवारी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2020-21 सादर अर्थमंत्र्यांनी केलं. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी वाढ 11 टक्क्यांनी वाढली आहे.

Stocks to Buy Today: बजेटच्या दिवशी या शेअर्सवर असुद्या लक्ष, बक्कळ वाढेल पैसा

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister) आर्थिक वर्ष 2021-22 (Budget 2021) चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात चढउतार दिसून येईल. शुक्रवारी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2020-21 सादर अर्थमंत्र्यांनी केलं. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी वाढ 11 टक्क्यांनी वाढली आहे. आता केंद्रीय अर्थसंकल्प 2021 च्या दिवशी बाजारपेठेचे निरीक्षक खास क्षेत्रांवर आणि शेअरवर लक्ष ठेवून असणार आहेत. (budget 2021 Stocks to Buy Today stocks to watch on budget day )

बाजारात कशी असेल हालचाल ?

गेल्या 11 वर्षांवर नजर टाकली तर बजेटच्या दिवशी शेअर बाजार घसरल्याचं समोर आलं. 2012, 2013, 2014, 2016, 2018 आणि 2020 मध्येही बजेटच्या दिवशी बाजार घसरला. त्यामुळे यंदाचा आठवडाही शेअर बाजारासाठी त्रासदायक असणार आहे. तज्ज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2021-22 चं सर्वसाधारण अर्थसंकल्प, आर्थिक डेटा आणि आरबीआयचा आर्थिक आढावा यासारख्या प्रमुख घडामोडींमुळे बाजार अस्थिर असण्याची शक्यता आहे.

या शेअर्सवर लक्ष ठेवा

सॅमको सिक्युरिटीजच्या सिनिअर एनालिस्ट निराली शाह यांच्या म्हणण्यानुसार, लार्सन अँड टुब्रो, गेल, एनटीपीसी, इंडियन ऑईल, पीएनसी इन्फ्राटेक, हुडको, डालमिया इंडिया भारतामध्ये तेजी आणू शकतात. यामुळे या शेअर्सवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवा.

या शेअर्सचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होईल फायदा

अर्थसंकल्पात सरकारच्या घोषणांचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेविषयीच्या एफएमसीजी, कृषी आणि संबंधित क्षेत्रांना होण्याची शक्यता आहे. कोरोमंडल इंटरनेशनल, रॅलिस इंडिया, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, डाबर इंडिया, इमामी, हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्सला मोठा फायदा होऊ शकेल.

रिलिगेअर ब्रोकिंगचे व्ही.पी. रिसर्च अजित मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने जर पायाभूत सुविधांवर जोर दिला तर एबीसी इंडियासारख्या असलेल्या सिमेंट कंपन्यांचा साठा आणि ओबेरॉय रिटेल आणि गोदरेज प्रॉपर्टीज सारख्या रिअल्टी कंपन्यांचे शेअर्स मिळू शकतात. इतकंच नाही तर यंदाच्या बजेटमध्ये वाहन कंपन्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी, अशोक लेलँड, बजाज ऑटो, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा यांना फायदा होऊ शकेल. (budget 2021 Stocks to Buy Today stocks to watch on budget day )

संबंधित बातम्या – 

Union Budget 2021 Marathi LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी, काही क्षणांत बजेट संसदेत सादर होणार

Gold rate today: बजेटआधी सोन्या-चांदीमध्ये मोठी उसळी, 4000 रुपयांनी वाढले भाव; वाचा आजचे दर

Stock Market Update : अर्थसंकल्पाची घोषणा होताच शेअर बाजार उसळणार, काय असेल चाल?

Budget 2021 सादर होण्याआधीच सरकारला मिळाली Good News, जानेवारीत ‘असा’ झाला फायदा

(budget 2021 Stocks to Buy Today stocks to watch on budget day )

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI