Budget 2021 सादर होण्याआधीच सरकारला मिळाली Good News, जानेवारीत ‘असा’ झाला फायदा

अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण प्रयत्न करणार आहेत. पण त्याआधीच सरकारला दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Budget 2021 सादर होण्याआधीच सरकारला मिळाली Good News, जानेवारीत 'असा' झाला फायदा
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 8:37 AM

नवी दिल्ली : Budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2021 रोजी म्हणजे आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण प्रयत्न करणार आहेत. पण त्याआधीच सरकारला दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जानेवारीत जीएसटी कलेक्शनच्या रेकॉर्डमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. जानेवारीत जीएसटीचं एकूण कलेक्शन 1.20 लाख कोटींवर पोहोचलं आहे. रविवारी वित्त मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. (good news before budget 2021 gst collection for january stood 1 2 lakh crore)

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2021 मधील जीएसटी कलेक्शन मागच्या वर्षाच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढलं आहे. यावेळी अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ’31 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जीएसटी कलेक्शन 1,19,847 कोटी रुपये होतं. यामध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) 21,923 कोटी रुपये, राज्ये जीएसटी (SGST) 29,014 कोटी, एकिकृत जीएसटी (IGST) रुपये 60,288 कोटी आणि सेर 8,622 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इतकंच नाहीतर जीएसटी विक्री परतावा भरल्याची संख्या जास्त असल्यामुळे हा आकडा आणखी जास्त असू शकणार आहे.

जीएसटी फसवणूकीच्या घटना कमी झाल्याने कलेक्शन वाढलं

जीएसटी कलेक्शन वाढीसंदर्भात सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कर घोटाळ्याच्या अनेक प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात आली. यामुळे रिटर्न फाइलिंगमध्ये तेजी पाहायला मिळाली. नोव्हेंबर 2020 पासून आतापर्यंत 274 लोकांना अटक करण्यात आली आहे, तर 8500 बोगस कंपन्यांविरूद्ध 2700 गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे 858 कोटी रुपये सरकारी तिजोरीत आले.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना वित्तीय तूट भरून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. देशावर कोरोनाचं संकट असलं तरी अनेक क्षेत्रात समाधानकारक प्रगती झाल्याचं चित्र आहे. लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयावरही कोरोनाच्या संकटाचा परिणाम झालेला असून, नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध झालेल्या नाहीत. वाहन आणि स्थावर मालमत्ता क्षेत्र अजूनही संघर्ष करीत आहे. नागरिकांना अधिक कर सवलती हव्या आहेत आणि जास्त उत्पन्न मिळावं ही अपेक्षा आहे. अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं आवाहनही सरकार पुढे आहे. आरोग्यसेवा क्षेत्रालाही कोरोनाच्या संकटामुळे वर्ष 2021 च्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात नागरिक आणि वैयक्तिक करदात्यांना करात सवलत मिळण्याची अपेक्षा आहे. (good news before budget 2021 gst collection for january stood 1 2 lakh crore)

संबंधित बातम्या – 

Budget 2021: मध्यमवर्गीयांनी या 6 घोषणांकडे लक्ष ठेवावं, थेट खिशावर परिणाम होऊ शकतो

Budget Marathi 2021-22 | दिल्लीतील शेतकरी आंदोलनात महिला, विद्यार्थ्यांची उडी; अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सीतारमण यांच्या सुरक्षेत वाढ

Bank Alert | 31 मार्चपर्यंत KYC करा, अन्यथा बंद होईल बँक खाते, ‘या’ बँकेचे ग्राहकांना फर्मान!

(good news before budget 2021 gst collection for january stood 1 2 lakh crore)

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.