Budget 2022: आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी आणि चीनवर अवलंबून न राहता येणाऱ्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन उचलतील का काही ठोस पावले?

Budget 2022: आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी आणि चीनवर अवलंबून न राहता येणाऱ्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन उचलतील का काही ठोस पावले?
प्रातिनिधीक फोटो

  भारत कच्चा मालासाठी अधिकतर अनेकदा चीनवर अवलंबून राहिलेला आहे,यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे भारत ने आतापर्यंत मॅन्युफॅक्चर सेक्टरमध्ये आपल्या क्षमतेला गंभीरतेने घेतले नाहीये.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 29, 2022 | 2:51 PM

Budget 2022 : भारताने 2021 मध्ये चीन सोबत व्यापार (India China Trade) वाढलेला आहे आणि हा व्यापार 125 बिलियन डॉलरवर पोहोचलेला आहे. भारताने चीन कडून 100 बिलियन डॉलर पेक्षा जास्त आयात केले आहे. या ट्रेंडमुळे स्पष्ट आपल्याला कळते की,चीन वर भारत अवलंबुन राहण्याची क्षमता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस आपण चीनवर अवलंबून राहत आहोत. चीनच्या जनरल एडमिनिस्ट्रेशन ऑफ कस्टम यांच्याकडून एक रिपोर्ट पब्लिश केला गेला आहे. या रिपोर्टनुसार भारतने चीनकडून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, फर्टिलाइजर, ऑटो कंपोनेंट, एक्टिव फार्मा इंग्रेडिएंट (API) चे आयात केलेले आहे. दिवसेंदिवस या आयातीमध्ये वाढ होत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या दरम्यान भारताने चीन कडून मागवलेली आयातमध्ये आपल्याला वाढ होताना दिसत आहे तसेच या वाढीने 52 टक्के उच्चांक गाठलेला आहे. भारतीय सरकार सातत्याने सांगत आहे की ते चीनवर अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वाने सगळ्या गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु असे कुठेही घडताना पाहायला मिळत नाहीये परंतु वेळेबरोबरच अवलंबून राहणे जास्तीत जास्त वाढताना दिसत आहे.अशातच येणाऱ्या काही दिवसांमध्ये अर्थसंकल्प 2022 (Budget 2022) जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये चीन व भारत यांच्या दरम्यान असलेले संबंध व भारत आत्मनिर्भरच्या ज्या काही गोष्टी करत आहे त्या संदर्भातील काही पावले उचलली जाणार आहेत का ? हे सुद्धा पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे आणि म्हणूनच येणारा काळ हा भारताला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी सुवर्ण संधी सुद्धा ठरणार आहे.

गोल्डमेडल इलेक्ट्रिकलचे डायरेक्टर किशन जैन यांनी असे म्हंटले आहे की, भारत कच्चामाल यासाठी जास्तीत जास्त चीनवर अवलंबून राहिलेला आहे, यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारताने आतापर्यंत मॅन्यूफॅक्चर सेक्टरमधील आपल्या क्षमतेवर काम केलेले नाही तसेच आपली क्षमता सुद्धा ओळखले नाही. त्यांनी सांगितले की, सरकारला रिसर्च अँड डेव्हलपमेंट साठी फंड वाढवावे लागतील. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये अशाप्रकारच्या घोषणा केल्या गेल्या जाव्यात जेणेकरून छोट्या कंपनींना त्याचा फायदा पोहोचू शकेल त्याचबरोबर मॅन्यूफॅक्चरची क्वालिटी आणि कॉन्टॅटी या दोघांमध्ये वाढ होईल तसेच असे केल्याने डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपल्याला वाढ होताना दिसेल दुसरीकडे आपण चीनवर अवलंबून राहण्याची शक्यता सुद्धा हळूहळू कमी होऊ लागेल.

कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबून राहणे दिवसेंदिवस वाढत आहे.

जैन यांनी सांगितले की, आपल्या देशातील अनेक उद्योग रॉ मटेरियल म्हणजेच कच्च्या मालासाठी जास्तीत जास्त चीनवर अवलंबून आहे यामध्ये मोबाईल फोन कंपोनेंट,ऑटो कंपोनेंट, सोलर सेल्स कंपोनेंट, फार्मास्युटिकल्स इंग्रेडिएंट,ऑटो कंपोनेंट, सोलर सेल्स कंपोनेंट, फार्मास्युटिकल्स इंग्रेडिएंट इत्यादींचा प्रामुख्याने समावेश आहे. आपले सरकार रिन्यूएबल एनर्जी बाबतीत गंभीर आहे परंतु महत्त्वाच्या घटकांच्या आयात मध्ये 80 टक्के हिस्सेदारी ही चीनची आहे. भारतातील ऑटो उद्योग अधिक तर चीनवर अवलंबून आहे म्हणूनच या मागील सर्वात महत्त्वाचे कारण असे आहे की आपण जास्तीत जास्त अवलंबून असल्याकारणाने चिप शॉर्टेज मुळे भारतीय ऑटो कंपनी यांची हालत दिवसेंदिवस बेकार होत आहे.

PLI स्कीम चा करावा लागेल विस्तार.

या समस्येचे निराकरण करत असताना गोदरेजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल वर्मा यांनी सांगितले की, सरकारने वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना विचारात घेत पीएलआय स्कीमचा विस्तार करावा लागेल. सध्याच्या काळामध्ये ज्या काही इंडस्ट्री या स्कीमच्या अंतर्गत येतात त्यांचा विस्तार प्रामुख्याने करावा तसेच नवीन काही इंडस्ट्रीचा सुद्धा समावेश या स्कीम मध्ये करण्याची गरज आहे.

उपलब्ध असलेल्या इन्फेक्शन वर फोकस करणे गरजेचे

Bizongo चे को-फाउंडर आणि COO म्हणजेच चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन अग्रवाल यांचे असे म्हणणे आहे की, भारताने अशा क्षेत्रांचा विचार करायला हवा, ज्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर आहेत. जसे की टेक्सटाइल, पॅकेजिंग, स्पेशल केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक गुड्स साठी इन्फ्रा आणि टेक्नोलॉजी आधीपासूनच उपलब्ध आहे अशातच सरकारने इंसेंटिवच्या मदतीने या सेक्टर्स मधील मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी मदत करायला हवी. तसेच या उद्योग क्षेत्रावर लक्ष केंद्रित सुद्धा करणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात यांचे विस्तारीकरण होऊन देशामध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. असे केल्याने आपण जास्त प्रमाणात आयात करणार नाहीत आणि म्हणूनच चीनवर सुद्धा भविष्यात आपल्याला अवलंबून राहावे लागणार नाही. याशिवाय ग्रीन एनर्जी कंपोनेंट, सोलर पॅनल, सेल्स, बॅटरीज, ट्वॉय सेगमेंट राजकीय दृष्ट्या सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. या सगळ्या क्षेत्रांमध्ये चीनचा दबदबा प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू वेळेनुसार घडतील.

Video : ‘ही’ आग लागली नाही, तर लावलीय; शिकागोतल्या रेल्वेरुळाच्या आगीचं काय आहे सत्य? वाचा…

नागपुरात दिव्याच्या प्रकाशात काढत होते दिवस; दिवा पेटला, भडका उडाला नि होत्याचं नव्हतं झालं!

IPL 2022: लखनऊचा संघ कुठल्या विचाराने मैदानात उतरणार? गौतम गंभीरने सांगितली सुपर जायंट्सची स्ट्रॅटजी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें