Video : ‘ही’ आग लागली नाही, तर लावलीय; शिकागोतल्या रेल्वेरुळाच्या आगीचं काय आहे सत्य? वाचा…

प्रदीप गरड

|

Updated on: Jan 29, 2022 | 2:32 PM

दरवर्षीप्रमाणेच अमेरिके(USA)तील शिकागो(Chicago)मध्ये ट्रेन ट्रॅकला आग लागल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कम्युटर रेल सिस्टीम मेट्रा(Metra)ने शिकागोमधील ट्रेनच्या ट्रॅकमधून ज्वाळा निघणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. पण का? हा स्टंट नाही. शिकागोच्या महानगर क्षेत्रात येणार्‍या तीव्र थंडी आणि हिवाळ्याच्या हवामानाचा सामना करण्यासाठी हे केलं जातंय.

Video : 'ही' आग लागली नाही, तर लावलीय; शिकागोतल्या रेल्वेरुळाच्या आगीचं काय आहे सत्य? वाचा...
रेल्वे रूळ आग, शिकागो
Follow us

Chicago train track fire : सोशल मीडियावर विविध विषयांवरचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले बहुतांश तर मीम्स असतात. मात्र काही व्हिडिओ तर खरेखुरे असतात. यूझर्स असे व्हिडिओ पाहणं पसंत करतात. कारण त्यात काहीतरी वेगळं असतं. दरवर्षीप्रमाणेच अमेरिके(USA)तील शिकागो(Chicago)मध्ये ट्रेन ट्रॅकला आग (Fire) लागल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कम्युटर रेल सिस्टीम मेट्रा(Metra)ने शिकागोमधील ट्रेनच्या ट्रॅकमधून ज्वाळा निघणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. पण का? हा स्टंट नाही. शिकागोच्या महानगर क्षेत्रात येणार्‍या तीव्र थंडी आणि हिवाळ्याच्या हवामानाचा सामना करण्यासाठी हे केलं जातंय. हे पूर्णपणे सुरक्षित आणि आवश्यक मानलं गेलंय. अत्यंत थंड हवामानात स्टील आकुंचन पावू शकतं, ज्यामुळे रेल्वे ट्रॅकला ब्रेक लागू शकतो. याव्यतिरिक्त, हे ट्रॅकवर धातूचं तापमान सामान्य ठेवण्यासाठी केलं जातं.

मऊ होतो धातू

अशा कडाक्याच्या थंडीत, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ‘मेट्रा’ आगीचा वापर स्विच ऑन ठेवण्यासाठी आणि ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी केला जातो. क्रू मेंबर्स आग आटोक्यात राहावी, यासाठी मदत करतात आणि ट्रेनच्या ट्रॅकला विंडी सिटी (Windy City)मध्ये चालू ठेवण्यासाठी आग लावतात. आगीनं ट्रॅक गरम केल्यानं धातू मऊ होतो.

रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असतात स्विच हीटर्स

फॉक्स वेदरच्या मते, संपूर्ण हिवाळ्यात उबदार ठेवण्यासाठी स्विच हीटर्स रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असतात. मेटासाठी कम्युनिकेशन्सचे संचालक मायकेल गिलिस म्हणाले, “स्विचच्या अगदी शेजारी गॅस बर्नर आहेत. हा किचन स्टोव्हटॉप गॅस स्टोव्हटॉपसारखा आहे. आमच्या सिस्टममध्ये सुमारे 500 स्विचेस आहेत, त्यांना उबदार ठेवावं लागेल आणि ओलावा त्यांच्यापासून दूर ठेवावा लागेल. कारण तुम्ही ते गोठवू शकत नाही.

Video : दहा वर्षाच्या जलपरीचा अनोखा विक्रम, काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवरून प्रवास

Dog Video : जोरदार लाटांमध्ये बुडत होता कुत्रा मग जीव धोक्यात घालत होमगार्डनं पाण्यात घेतली उडी, आणि…

Video Viral : अंडी वाचवण्यासाठी कोंबडीनं घेतला ‘कोब्रा’शी पंगा; आपल्या चोचीनं केला हल्ला, अखेर…

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI