Budget 2025 : Electric Car अजून स्वस्त, आता नवीन वर्षात कार आणा घरी, बजेटमुळे मोठी संधी
Budget 2025 Electric Car Price: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मोदी सरकारच्या तिसर्या कार्यकाळातील पूर्ण बजेट सादर केले. सर्वसामान्यांपासून ते कॉर्पोरेट जगतापर्यंत अनेकांना मोठा दिलासा दिला. EV कार खरेदी सोपी झाली.

Electric Vehicle Price : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांचा 8 वा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटकडून सर्वसामान्यांना मोठी अपेक्षा होती. यावेळी मोदी सरकारने सर्वसामान्यांना निराश करण्याचे धोरण सोडले. करदात्यांना छप्परफाड गिफ्ट दिले. सर्वसामान्यांपासून ते कॉर्पोरेट जगतापर्यंत अनेकांना मोठा दिलासा दिला. इलेक्ट्रिक वाहन ते मोबाईल बॅटरीपर्यंत अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. या बजेटमधून अजून एक गोष्टी स्पष्ट झाली आहे की, आर्थिक वर्ष 2025-2026 साठी केंद्र सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकलवर लक्ष केंद्रीत केले आहे. या बजेटने EV कार खरेदी सोपी केली आहे.
इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना दिलासा
बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सुस्तावलेल्या ऑटो सेक्टरला यामुळे गती मिळाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी या बजेटमध्ये एक रोडमॅप तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहन पूर्वीपेक्षा स्वस्त होतील. बॅटरी आणि इतर सुट्टे पार्ट स्वस्त होण्याची शक्यता वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची विक्री वाढणार आहे.




लिथियम ऑयन बॅटरी स्वस्त
बजेट 2025 मध्ये सर्वसामान्यांनाच नाही तर कंपन्यांना सुद्धा दिलासा देण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी स्वस्त होणार आहे. यासोबतच स्मार्ट टीव्ही, मोबाईल, लिथियम ऑयन बॅटरीवरील कर कमी करण्याची घोषणा या क्षेत्राच्या पथ्यावर पडणार आहे. लिथियम ऑयन बॅटरी स्वस्त झाल्याने त्याचा थेट परिणाम इलेक्ट्रिक वाहनांवर दिसून येईल.
ऑटो कंपन्यांची विक्री वाढणार?
मोदी सरकारने ऑटो क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे. वाहन उत्पादन क्षेत्रात ईव्ही क्रांतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. आता आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांची विक्री वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम लवकरच इलेक्ट्रिक वाहन बाजारात दिसून येईल. सुस्तावलेल्या ऑटो सेक्टरला यामुळे गती मिळाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी या बजेटमध्ये एक रोडमॅप तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता कंपन्या नवीन किंमती कधी जाहीर करता, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.