AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2025 : मध्यमवर्गावर यंदा तरी मेहरबान होणार का मोदी सरकार? आयकरात मिळेल दिलासा?

Budget 2025 Middle Class : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण अगदी थोड्याच वेळात 8 वा अर्थसंकल्प सादर करतील. महागाई आणि वेतनाचा फायदा मिळण्याची मोठी अपेक्षा मध्यमवर्गाला आहे. आयकर स्लॅबमध्ये कपात होण्याची अपेक्षा आहे.

Budget 2025 : मध्यमवर्गावर यंदा तरी मेहरबान होणार का मोदी सरकार? आयकरात मिळेल दिलासा?
बजेटमध्ये मध्यमवर्गाला मिळणार काय
Follow us
| Updated on: Feb 01, 2025 | 9:30 AM

बजट 2025 अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग 8 व्यांदा बजेट सादर करतील. असे करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील. तर सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थमंत्री महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या मध्यमवर्ग हा कराचे ओझे आणि महागाईने पार होरपळला आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपासून रेपो दरात कपात न झाल्याने कर्जाच्या हप्त्याचे ओझे त्याला सहन करावे लागत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला आयकरमध्ये दिलासा हवा आहे. आता थोड्यात वेळात देशातील मोठ्या वर्गाच्या पदरात काय पडते हे समोर येईल.

आयकर स्लॅबमध्ये मिळेल का दिलासा?

केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण थोड्याच वेळात त्यांचे आठवे बजेट सादर करतील. मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी आयकर स्लॅबमध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वित्तीय तूट कमी करण्यासोबतच आर्थिक वृद्धी दर गाठण्याचे आव्हान सरकारसमोर आबे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि मध्यमवर्गावर आई महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम असो, असे शुभ संकेत दिले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

25 टक्के होईल कर

मोदी सरकार नवीन कर प्रणालीवर अधिक जोर देत आहे. जुनी कर व्यवस्था आता केवळ पर्याय म्हणून उरली आहे. मध्यमवर्गासाठी नवीन कर प्रणाली आकर्षक करण्यावर जोर देण्यात येत आहे. देशातील 72 टक्के करदात्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे. केवळ 28 टक्के करदातेच जुनी कर प्रणालीत आहेत. एका अंदाजानुसार केंद्र सरकार सरसकट 8 लाख वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर न लावण्याचा निर्णय घेऊ शकते. तर त्यानंतरच्या कमाईवर 25 टक्के कर लावण्याचा प्रस्ताव असेल. सरकार अनेक कर सवलती आणि कर सूट बंद करुन कर व्यवस्था अधिक सुटसुटीत करण्यावर भर देण्याची शक्यता आहे. 2025 चे बजेट हे मध्यमवर्गाला मोठे गिफ्ट ठरू शकते.

मूळ सवलत 3.5 लाख होण्याची शक्यता

इकोनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, भारत सरकार आयकराच्या मूळ सवलत मर्यादा 3 लाखांवरून 3.5 लाख होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत वर्षाकाठी मध्यमवर्गाच्या हाती थोडीतरी बचत असेल. तर कपात मर्यादेत वाढ होऊन दिलासा मिळू सकतो. तर अनेक बचत योजनांवर कर सवलतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.