AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 1 February 2025 : Budget 2025 रोजीच सोने-चांदीची ऐतिहासिक कामगिरी, ग्राहकांच्या खिशावर दरोडा, किंमती वधारल्या

Gold Silver Rate Today 1 February 2025 : Budget 2025 रोजी सोने-चांदीने ऐतिहासिक कामगिरी केली. अर्थसंकल्पाच्या दिवशीच ग्राहकांच्या खिशावर दरोडा पडला. गेल्या तीन दिवसात दोन्ही मौल्यवान धातुनी तुफान बॅटिंग केली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 1 February 2025 : Budget 2025 रोजीच सोने-चांदीची ऐतिहासिक कामगिरी, ग्राहकांच्या खिशावर दरोडा, किंमती वधारल्या
सोने-चांदीची तुफान घोडदौड
| Updated on: Feb 01, 2025 | 8:59 AM
Share

Budget 2025 रोजीच सोने आणि चांदीच्या किंमतीत तुफान आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात किंमतीत मोठी घसरण झाली. तर त्यानंतर दरवाढीचा आलेख दिसून आला. सोने 1200 रुपयांनी वधारले. तर चांदी 3 हजारांनी उसळली. ऐन अर्थसंकल्पाच्या दिवशीच दोन्ही धातुत मोठी वाढ झाली. ग्राहकांच्या खिशावर दरोडा पडला. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या आणि एक किलो चांदीची आता अशी आहे किंमत. (Gold Silver Price Today 1 February 2025 )

सोन्याची रॉकेट भरारी

मागील दोन आठवड्यात सोन्यात 3000 रुपयांची दरवाढ झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला अनुक्रमे 170 आणि 320 अशी 490 रुपयांची घसरण झाली. तर 29 जानेवारीला सोने 920 रुपयांनी, 30 जानेवारी रोजी 170 तर 31 जानेवारी रोजी 1310 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 77,460 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 84,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी लाखाच्या उंबरठ्यावर

चांदीने या महिन्यात दरवाढीला ब्रेक लावला असला तरी अनेकवेळा मोठी झेप घेतली. या 24 जानेवारीला 1 हजारांची दरवाढ तर 27 जानेवारीला 1 हजारांची घसरण झाली. त्यानंतर 30 जानेवारी रोजी चांदी 2 हजारांनी वधारली. 31 जानेवारी रोजी त्यात हजारांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,600 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 82,086, 23 कॅरेट 81,757, 22 कॅरेट सोने 75,191 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 61,565 रुपये, 14 कॅरेट सोने 48,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,533 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...