कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट; पेट्रोल, डिझेलचे भाव कमी होणार?

आज पुन्हा एकदा अंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅलर 82 डॉलरपर्यंत खाली आल्याने, पेट्रोल, डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी होऊन दिलासा मिळू शकतो.

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट; पेट्रोल, डिझेलचे भाव कमी होणार?
पेट्रोल
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 8:19 AM

नवी दिल्ली – आज पुन्हा एकदा अंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅलर 82 डॉलरपर्यंत खाली आल्याने, पेट्रोल, डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी होऊन दिलासा मिळू शकतो. अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाची क्रूड इन्व्हेंटरी वाढल्याने, कच्च्या तेलाचे दर घसरल्याचे पहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट झाली असताना देखील भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. त्यामध्ये कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. ‘एचपीसीएल’ने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 104.01 आहे. तर डीझेलचा दर 86.71 रुपये प्रति लिटर एवढा आहे.

‘असे’ ठरतात पेट्रोल, डिझेलचे दर 

पेट्रोल -डिझेलचे भाव हे अंतराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाची किंमत आणि रुपयांच्या मुल्यावर अवलंबून असते. अंतराष्ट्रीय बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आणि रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेमध्ये वाढले तर भारतामध्ये पेट्रोल,डिझेल स्वस्त होते. या उलट जर कच्च्या तेलाचे दर वाढले आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर इंधनाच्या किंमती वाढतात.

कच्च्या तेलाचे उत्पादन वाढले

अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन दहा लाख बॅलरने वाढले आहे. त्यामुळे येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. कोरोना काळामध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाली होती. मात्र आता उत्पादन हे कोरोना पूर्व काळातील लेव्हलवर पोहोचल्याचे पहायला मिळत आहे. जर कच्च्या तेलाच्या किमती अशाच कमी होत राहिल्या तर भारतामध्ये देखील पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊ शकते. दिवाळीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलवरी उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने, पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले होते.

संबंधित बातम्या 

Paytm ने शेअर विक्रीत इतिहास रचला, 18300 कोटी रुपयांचा IPO पूर्ण सबस्क्राईब झाला

भारतात पेट्रोल कार इतक्‍याच स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार, काय आहे नितीन गडकरींचा प्लान?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.