AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2021 : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची बजेटवर एका ओळीत कमेंट

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad on Budget) यांनी अर्थसंकल्प 2021 वर टीकास्त्र सोडलं आहे.

Budget 2021 : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची बजेटवर एका ओळीत कमेंट
जितेंद्र आव्हाड
| Updated on: Feb 01, 2021 | 5:10 PM
Share

Budget 2021 मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad on Budget) यांनी अर्थसंकल्प 2021 वर टीकास्त्र सोडलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा सरळ आणि सोपा अर्थ म्हणजे देश विकायला काढला आहे“. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीच दिलं नाही. आर्थिक कंबरडं मोडलं तर देशाचा तुर्की व्हायला नको. अर्थसंकल्प कुणासाठी सादर झाला हे मला समजलेलं नाही. LIC बाबत झालेल्या निर्णयाचे गरिबांचा इथे गुंतवलेला पैसा जाणार नाही याची हमी सरकार घेणार आहे का? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

देश विकायला काढलाय, शेतकर्‍यांसाठी काय आणलं? पेट्रोलची सेंच्युरी होईल याची तरतूद सरकारने केली आहे. 24 तास 365 दिवस आम्ही राजकारण करतो. आम्ही तामिळनाडू, पश्चिम बंगालला निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही पैसे दिले आहे, असा टोला आव्हाडांनी केंद्राला लगावला.

जीएसटीचा पैसा परत देऊ असं मोदींनी सांगितले, तो परत कधी देणार ते सांगा. अडचणीच्या काळात राज्य सरकार कर्ज उचलत असताना केंद्राकडे पडलेले हजारो कोटी रुपयातील एक दमडी तरी महाराष्ट्राला द्या, असंही जितेंद्र आव्हाडांनी नमूद केलं.

अजित पवारांचं टीकास्त्र 

“कोरोना विषाणूची लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

(Jitendra Awhad on Budget)

VIDEO : जितेंद्र आव्हाड यांची बजेटवर घणाघाती टीका

अर्थसंकल्प सादर

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला अर्थसंकल्प 2021-22 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पावर कोरोना प्रादुर्भाव, मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर असं मोठं संकट होतं. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.

संबंधित बातम्या  

अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं; अजित पवारांची जहरी टीका

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.