24 लाख कमवणाऱ्यांचीही आयकरात घसघशीत बचत होणार, कोणत्या स्लॅबमधून किती होणार बचत, समजून घ्या संपूर्ण गणित
Income Tax Slab Change : आयकर स्लॅबमधील बदलामुळे सरकारच्या खजीन्यातून एक लाख कोटींचे उत्पन्न कमी होणार आहे. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांची काळजी केली नाही. त्यांनी केलेल्या घोषणाचा आता सर्वच आयकर दात्यांना फायदा होणार आहे.

Income Tax Slab Change : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता 12 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरण्याची गरज नाही. नवीन करप्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 7 लाख रुपयांच्या कमाईवर कोणताही कर भरावा लागत नव्हता. स्टँडर्ड डिडक्शन फक्त 75000 रुपये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कोणताही कर लागणार नाही.
जुन्या करप्रणालीत बदल नाही
आयकर स्लॅबमधील बदलामुळे सरकारच्या खजीन्यातून एक लाख कोटींचे उत्पन्न कमी होणार आहे. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांची काळजी केली नाही. त्यांनी केलेल्या घोषणाचा आता सर्वच आयकर दात्यांना फायदा होणार आहे. 24 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांची 1.10 लाख रुपयांची बचत होणार आहे. नवीन करप्रणालीतच सर्व बदल करण्यात आला आहे. जुनी कर व्यवस्थेत कोणताही नाही.
कोणाचा होणार किती फायदा
नवीन घोषणेमुळे सर्वच आयकर भरणाऱ्यांची बचत होणार आहे. 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना थेट 80 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. 12 ते 18 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला 70 हजार रुपये फायदा होणार आहे. 24 लाखांपर्यंत कमाई करणाऱ्यांना 1.10 लाख रुपयांची बचत होणार आहे. जी जुन्या नियमानुसार 25 टक्के आहे. तसेच 50 लाख उत्पन्न असणाऱ्यांचेही 1.10 लाख रुपयांची बचत होणार आहे.




आयकर स्लॅबमध्ये सरकारने केलेल्या बदलांमध्ये, 25% चा नवीन कर स्लॅब अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. नवीन टॅक्स स्लॅब पाहिल्यास 16 ते 20 लाख रुपयांच्या कमाईवर आता 20 टक्के कर लागू होईल.
कोणाची कशी होणार बचत पाहू या…
12 लाखांपर्यंतचे उत्पन्न आयकराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. परंतु 75 हजार रुपयांचे स्टॅडर्ड डिडक्शन असणाऱ्यांना आयकरातील सुट 12.75 लाख रुपये होणार आहे. म्हणजेच 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांवर कोणताही कर आकारला जाणार नाही.