AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 मिनिटात 27,000 कोटींची कमाई! Pepsico चा मित्र मालामाल

Pepsico | वरुण बेव्हरेजेज लिमिटेडच्या शेअरने कमाल केली. या शेअरमध्ये तुफान तेजी दिसली. कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 200 रुपयांची तेजी दिसून आली. हा शेअर 1350 रुपयांवर उघडला आणि एका मिनिटांत त्याने 1380.45 रुपयांचा विक्रम केला. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅपमध्ये जोरदार वाढ झाली. गुंतवणूकदारही मालामाल झाले.

1 मिनिटात 27,000 कोटींची कमाई! Pepsico चा मित्र मालामाल
| Updated on: Dec 20, 2023 | 2:20 PM
Share

नवी दिल्ली | 20 डिसेंबर 2023 : पेप्सीची सर्वात मोठी बॉटलर कंपनी वरुण बेव्हरेजेज लिमिटेडच्या शेअरमध्ये 18 टक्क्यांची तेजी दिसून आली. एका मिनिटात या शेअरने सर्व रेकॉर्ड तोडले. एकाच मिनिटात कंपनीला 27 हजार कोटी रुपयांहून अधिकचा फायदा झाला. एका दिवसापूर्वीच्या वृत्ताचा परिणाम दिसला. वरुण बेव्हरेजज लिमिटेड दक्षिण अफ्रिकेतील बेवको या बेव्हरेज समूहातील कंपनी खरेदी करणार असल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी दिसून आली. त्याचा फायदा कंपनीला आणि तिच्या गुंतवणूकदार कंपन्यांना झाला.

कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी

वरुण बेव्हरेजेज लिमिटेडच्या शेअरमध्ये आज तुफान तेजीचे सत्र दिसले. कंपनीचे शेअर जवळपास 200 रुपयांच्या तेजीसह 1350 रुपयांवर उघडला. एका मिनिटात हा शेअर 1380.45 रुपयांवर पोहचला. एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअरमध्ये उसळला होता. पण आज त्यात कालच्या तुलनेत 18 तेजी दिसून आली. मंगळवारी कंपनीचा शेअर 1172 रुपयांवर बंद झाला.

1 मिनिटात 27 हजार कोटींचा फायदा

या तुफान तेजीमुळे कंपनीचे मार्केट कॅप जबरदस्त वाढले. आकड्यावर नजर टाकली असता एका दिवसापूर्वी बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 1,52,151.75 कोटी रुपये होते. तर कंपनीचा शेअर आज 1380.45 रुपयांवर पोहचला. तेव्हा कंपनीचे बाजारातील भांडवल 1,79,213.22 कोटी रुपयांवर पोहचले. याचा अर्थ कंपनीने एका मिनिटात 27,061.47 कोटी रुपये कमावले. प्री ओपनिंग मार्केटसह शेअर बाजाराने सुरुवातीलाच दमदार घौडदौड केली. आज बीएसई आणि एनएसई निफ्टीने जोरदार कामगिरी बजावली.

एका बातमीने शेअर एकदम तेजीत

वरुण बेव्हरेजेज लिमिटेडने (VBL) मंगळवारी दक्षिण अफ्रिकेतील शीतपेय कंपनी बेवकोसोबत तिची उपकंपनीचे अधिग्रहण केल्याचे वृत्त समोर आणले. हा सौदा 1,320 कोटी रुपयांना पूर्ण झाला. त्यामुळे वरुण बेव्हरेजला आफ्रिकी बाजारात विस्तार करण्यास मदत होणार आहे. बेवकोकडे दक्षिण आफ्रिका, लेसोथो आणि इस्वातिनीमध्ये पेप्सिकोची फ्रँचाईज आहे. या कंपनीकडे नामिबिया आणि बोत्सवानाच्या वितरणाचा अधिकार आहे. VBL च्या अंदाजानुसार हा करार 31 जुलै, 2024 पूर्वी पूर्ण होईल. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये बेवकोचा निव्वळ नफा 1,590 कोटी रुपये होता.

Follow Us
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत
Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत काय म्हणाले?
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितल
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितली A टू Z माहिती
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर विरोधकांचा मिळणार पाठिंबा, एकाऐकी काय घडलं?
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे 50 मिनिटांच्या बैठकीत...
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून.

Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ.

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ

तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!

त्या दिवसापासून ती कुणाशी बोललीच नाही..अखेर आयुष्यच संपवलं; धक्कादायक घटनेने डोंबिवलीत हळहळ.

त्या दिवसापासून ती कुणाशी बोललीच नाही..अखेर आयुष्यच संपवलं; धक्कादायक घटनेने डोंबिवलीत हळहळ

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, दिल्ली हायकोर्टाची केंद्रासह दिल्ली सरकारला नोटीस, मोठी अपडेट काय?.

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, दिल्ली हायकोर्टाची केंद्रासह दिल्ली सरकारला नोटीस, मोठी अपडेट काय?

7 वी नापास, हॉटेलमध्ये बनला वेटर, बांगड्याही विकल्या.. आज हा सुपरस्टार 2400 कोटींचा मालक.

7 वी नापास, हॉटेलमध्ये बनला वेटर, बांगड्याही विकल्या.. आज हा सुपरस्टार 2400 कोटींचा मालक