Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DA Hike 2025 : केंद्रीय कर्मचार्‍यांना झटका, महागाई भत्त्याचा झाला ‘खेळ’, केवळ मिळणार इतकीच वाढ

7th Pay Commission DA Hike : केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठा झटका, केवळ इतके टक्के वाढ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे केंद्रीय कर्मचारी खट्टू होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्याचाच खेळ झाला आहे. कर्मचार्‍यांना केवळ इतकी टक्केच वाढीची शक्यता आहे.

DA Hike 2025 : केंद्रीय कर्मचार्‍यांना झटका, महागाई भत्त्याचा झाला 'खेळ', केवळ मिळणार इतकीच वाढ
महागाई भत्ताImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 22, 2025 | 2:23 PM

केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) नुकतीच घोषणा केली आहे. त्यानंतर महागाई भत्ता देण्याचे जाहीर झाले. सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी 8 व्या वेतन आयोग स्थापण्याचे जाहीर केले. त्याच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 रोजीपासून लागू होतील.केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ते (Dearness Allowance – DA) आणि सेवा निवृत्तीधारकांसाठी महागाई दिलासा (Dearness Relief – DR) रक्कमेत वाढीसाठी आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. केंद्रीय कॅबिनेटच्या (Union Cabinet ) बैठकीत यावर अखेरचा निर्णय घेण्यात येईल. जर या महागाई भत्त्याला मंजूरी मिळाली तर नवीन DA जानेवारी 2025 लागू होऊ शकतो. म्हणजे कर्मचार्‍यांचा मार्च महिन्यातील पगार वाढू शकतो. त्यांना दोन महिन्यांची थकबाकी (DA Arrears) पण मिळेल.

आनंदावर पडणार विरजण

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार होळीच्या जवळपास DA मध्ये वाढीची घोषणा करत आहे. पण यंदा कर्मचाऱ्यांना पदरात निराशा पडू शकते. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (All India Consumer Price Index – AICPI) आकडेवारीनुसार, यंदा DA मध्ये केवळ 2 टक्क्यांच्या वाढीची शक्यता आहे. जी गेल्या 7 वर्षांतील डीएच्या तुलनेत सर्वात कमी असेल. जुलै 2018 मध्ये सरकारने डीएमध्ये कमीत कमी 3% वा 4% ची वाढ केली आहे. काही वेळा तर यापेक्षा पण ती अधिक राहिली. त्यामुळे यंदा महागाई भत्त्यामध्ये केवळ दोन टक्के वाढ त्यांच्या आनंदावर विरजण पडण्यासारखे आहे.

हे सुद्धा वाचा

AICPI निर्देशांकावर सर्व गणित

कर्मचाऱ्यांना वर्षांतून जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता लागू करण्यात येतो. पण प्रत्येक वर्षी डीएची घोषणा उशीरा करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते. ही आकडेवारी कामगार मंत्रालय जाहीर करतो. त्यानंतर सरकार मागील 6 महिन्यांचे AICPI-IW डेटा विश्लेषण करून पुढील 6 महिन्यांसाठी DA वाढीचा दर निश्चित करते.

जुलै 2018 नंतरची सर्वात कमी वाढ

जुलै 2018 नंतर म्हणजेच सुमारे 78 महिन्यानंतर महागाई भत्त्यामध्ये (DA) 2% वाढ ही सर्वात कमी असेल. यापूर्वी जुलै ते डिसेंबर 2018 या कालावधीत सर्वात कमी वाढ झाली होती, आणि त्यावेळीही 2% वाढ करण्यात आली होती.

माय-लेकीच्या नात्यावर 'पुरातन', रितुपर्णा सेनगुप्ता म्हणाल्या...
माय-लेकीच्या नात्यावर 'पुरातन', रितुपर्णा सेनगुप्ता म्हणाल्या....
मुंबईतील जैन मंदिरावर पालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक, मागणी काय?
मुंबईतील जैन मंदिरावर पालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक, मागणी काय?.
'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले
'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले.
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.