8000 कोटींची संपत्ती; 23,000 कोटींची कंपनी, 80 वर्षांच्या तरुण उद्योजकाला भेटलात का?

Lalit Khetan : ललित खेतान, 80 व्या वर्षी दिग्गज उद्योगपतींच्या यादीत आले आहेत. तुम्ही त्यांचे नाव अगोदर पण ऐकले असेल. वय हा केवळ आकडा आहे, हे सिद्ध करायला हे उदाहरण एकदम बोलकं आहे. कोण आहेत ललित खेतान, ते काय उद्योग करतात, जाणून घ्या..

8000 कोटींची संपत्ती; 23,000 कोटींची कंपनी, 80 वर्षांच्या तरुण उद्योजकाला भेटलात का?
कोण आहेत ललित खेतान
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 2:27 PM

देशात अब्जावधीश उद्योगपतींची संख्या तेजीने वाढत आहे. स्टार्टअप्सच्या संस्कृतीने तरुण उद्योजकांची लाट आली आहे. केवळ 30 ते 40 वर्षांच्या वयात अनेक तरुणांनी मोठा व्यवसाय उभारला आहे. काही वर्षांपूर्वी नोकरीसाठी मारामार करणाऱ्या काहींनी मोठे नाव कमावले आहे. पण यशाला कोणीही गवसणी घालू शकते. वय हा केवळ एक आकडा आहे, हे सिद्ध करणारे एक जबरदस्त उदाहरण आपल्यासमोर आहे. ललित खेतान यांनी अवघ्या 80 व्या वर्षी तरुणांना लाजवेल अशी कामगिरी बजावली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला Forbes ने अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध केली. त्यात जगातील अब्जाधीशांच्या यादीत 25 नवीन भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात 80 व्या वर्षी खेतान यांचे नाव अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. कोण आहेत खेतान, ते काय व्यवसाय करतात?

संभाळली कंपनी, मग कमावले नाव

ललित खेतान हे रॅडिको खेतानचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी दारुची निर्मिती करते. रॅडिको खेतानचे पूर्वीचे नाव रामपूर डिस्टिलरी असे होते. स्वातंत्र्यपूर्व काळात या कंपनीने 1943 मध्ये उत्पादनाला सुरुवात केली होती. 1970 च्या सुरुवातीला ललित खेतान यांचे वडील जी एन खेतान यांनी रामपूर डिस्टिलरी अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या कामकाज सांभाळले. त्यांनी कंपनीचे नाव बदलले. 1995 मध्ये त्यांनी ललित यांच्याकडे कंपनीची सूत्र आली आणि कंपनीची घौडदौड सुरु झाली.

हे सुद्धा वाचा

85 देशांमध्ये विक्री

HT च्या वृत्तानुसार, ललित खेतान यांनी 1997 मध्ये रॅडिको खेतान लिमिटेडमध्ये मार्केटिंग विभागातून कामकाजाला सुरुवात केली. 1998 मध्येच त्यांनी 8PM व्हिस्की व्हिस्की बाजारात उतरवली. हे उत्पादन मद्यप्रेमींना आवडले. या मद्याच्या 10 लाख पेट्यांची हातोहात विक्री झाली. या व्हिस्कीचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सहभागी झाले. ललित खेतान यांच्या नेतृत्वात कंपनीचा महसूल आणि बाजारातील शेअर वाढला. आज कंपनी 85 हून अधिक देशांमध्ये अल्कोहल उत्पादनांची निर्यात करते.

मद्य उद्योगात मोठे नाव

भारताच्या मद्य उद्योगात रॅडिको खेतानचे मोठे नाव आहे. मॅजिक मोमेंट्स वोडका, 8 पीएम व्हिस्की, ओल्ड एडमिरल ब्रँडी आणि रामपूर सिंगल माल्ट सारख्या ब्रँडचा त्यात समावेश आहे. या कंपनीचे बाजारातील मूल्य जवळपास 23700 कोटी रुपये आहे. तर ललित खेतान यांची एकूण संपत्ती 1 दशलक्ष डॉलर म्हणजे 83,38,33,50,000 रुपये इतकी आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.