AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: जुनी पेन्शन योजना, निवृत्तीचे वय 65 वर्षे… भरपूर सुट्या? सरकारी कर्मचाऱ्यांची पाचही बोटं तुपात? 8 वेतन आयोगाची अपडेट काय?

8th Pay Commission: 8 वेतन आयोगाच्या प्रत्येक अपडेटकडे सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष आहे. त्यांच्या संघटना, प्रतिनिधी सध्या वेतन आयोगात गलेलठ्ठ पगार, जुनी पेन्शन योजना, निवृत्तीचे अधिक वय, फिटमेंट फॅक्टर यावर अधिक जोर देत आहेत. आयोगासमोर त्यांच्या आग्रही मागण्या रेटून धरत आहेत.

8th Pay Commission: जुनी पेन्शन योजना, निवृत्तीचे वय 65 वर्षे... भरपूर सुट्या? सरकारी कर्मचाऱ्यांची पाचही बोटं तुपात? 8 वेतन आयोगाची अपडेट काय?
8 वेतन आयोगाची अपडेट काय?
| Updated on: Aug 09, 2026 | 1:00 PM
Share

ऑल इंडिया NPS एप्लॉईज फेडरेशन (AINPSEF) अंतर्गत काम करणाऱ्या सरकारी शाळा शिक्षकांच्या संघटनेने दिल्लीत मोठी मागणी केली. 8 व्या वेतन आयोग सध्या राष्ट्रीय राजधानीत तळ ठोकून आहे. विविध कर्मचारी प्रतिनिधी आणि संघटनांच्या शिफारशी आणि मागण्या ते जाणून घेत आहेत. आयोगाचे अध्यक्षांसह सदस्य कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या सूचनांवर विचार करत आहेत. या संघटनेने अनेक मागण्या केल्या आहेत. फिटमेंट फॅक्टर हा सर्वांचा कळीचा मुद्दा तर आहेच. पण त्यासोबतच या संघटनेने जुन्या पेन्शन योजनेसाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. तर अधिक सुट्यांची मागणी आणि सेवा निवृत्तीचे वय 65 करण्याच्या मागणीने देशाचे लक्ष वेधले आहे. बढती, निवृत्तिनंतरचे फायदे, आरोग्य विमा आणि पेन्शनच्या किचकट नियमांवर या संघटनेने बोट ठेवले आहे.

AINPSEF नुसार केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय, दिल्ली MCD आणि NDMC शाळांसह केंद्रशासित प्रदेशातील सरकारी शाळांनी याविषयीची मागणी रेटली आहे. दिल्लीत 8 व्या वेतन आयोगाचे सदस्य विविध सरकारी संघटना आणि निवृत्तीधारकांच्या संघटनासोबत चर्चा करत आहेत. ही बैठक 7 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. 10 ऑगस्टपर्यंत आयोग चर्चेसोबतच सूचना, हरकती स्वीकारल्या जातील. कर्मचारी संघटना, पेन्शनर्स आणि त्यांचे प्रतिनिधी आयोगाच्या सदस्यांसमोर त्यांची बाजू मांडली.

शिक्षकांना हव्यात अधिक सवलती

शिक्षक संघटनांनी नवीन वेतन आयोगासमोर त्यांची बाजू मांडली. सर्व केंद्रीय सरकारी शिक्षकांना समान वेतन, भत्ते आणि सेवांस अनुषांगिक लाभ देण्याची मागणी करण्यात आली. एक भारत, श्रेष्ठ भारत हे स्वप्न साकारायचे असेल तर सर्व शिक्षकांच्या सवलती एकसमान असायला हवा अशी मागणी करण्यात आली. देशातील प्रत्येक शहरातील खर्चाचे गणित वेगळे आहे. पण पगारात समानता हवी. शिक्षकांचे पे स्केल आणि इतर भत्ते एकसमान असावेत अशी मागणी करण्यात आली.

जुनी पेन्शन योजनेची मागणी

शिक्षक संघटनेच्या मुख्य मागणीत जुनी पेन्शन योजना (OPS) आणि अधिक सुट्यांसह पदोन्नतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सरकारी शाळांच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. 1 जानेवारी 2004 आणि त्यानंतर सेवेत दाखल केंद्र सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांना राष्ट्रीय पेन्शन सिस्टिममध्ये सहभागी करण्यात आले होते. आता शिक्षकांना युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यासोबतच पुरूष कर्मचाऱ्याला नोकरी दरम्यान लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी सुट्टी मिळावी अशी मागणीही करण्यात आली आहे. कॅशलेस मेडिकल सुविधाचा लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा