AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Address Change: आधार कार्डवरील पत्ता बदलण्याचा जुना नियम बदलला, जाणून घ्या नवी प्रक्रिया

जर तुम्ही तुमचे घर किंवा मोबाईल नंबर बदलला असेल, तर अशा परिस्थितीत तुमचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. जर आधार अद्ययावत केले नाही, तर तुम्ही अनेक योजना किंवा लाभांपासून वंचित राहू शकता.

Aadhaar Address Change: आधार कार्डवरील पत्ता बदलण्याचा जुना नियम बदलला, जाणून घ्या नवी प्रक्रिया
Aadhaar Number
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 3:44 PM
Share

नवी दिल्लीः आधार कार्ड हे आज सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी किंवा कोणतेही काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. बँकेत खाते उघडायचे असो की मोबाईल सिमकार्ड घ्यायचे, आता आधार क्रमांक आवश्यक आहे. कधी कधी असे देखील होते की, आधारवर दिलेली माहिती अद्ययावत करावी लागते. जर तुम्ही तुमचे घर किंवा मोबाईल नंबर बदलला असेल, तर अशा परिस्थितीत तुमचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. जर आधार अद्ययावत केले नाही, तर तुम्ही अनेक योजना किंवा लाभांपासून वंचित राहू शकता.

तुम्ही घरूनही ऑनलाईन काम करू शकता

आधारवर दिलेली माहिती बदलण्याचे काम सोपे आहे. यासाठी तुम्ही घरूनही ऑनलाईन काम करू शकता. हे काम फक्त मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने करता येते. काही अद्ययावत कार्ये कठीण आहेत, ज्यासाठी आपल्याला आधार केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. केंद्राला भेट दिल्याशिवाय हे काम घरून करता येत नाही. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), आधार एजन्सीने यासाठी काही विशेष नियम केलेत. या नियमानुसार, UIDAI ने आधार अद्ययावतसंबंधित काही कामात बदल केलेत. भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तुमच्यासाठी या बदलांबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

UIDAI ने काय म्हटले?

UIDAI ने याआधी आधार कार्ड धारकांना अनेक सुविधा दिल्या होत्या, ज्यात त्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय अपडेट करता येत होते. नावात बदल करण्याबाबतही ही सुविधा दिली जात होती. यामुळे कार्डधारकाला ते सोपे झाले आणि तो हे काम ऑनलाईन करू शकतो. पण आता ही सेवा बंद करण्यात आलीय. आता आधार कार्डधारक कोणत्याही पुराव्याशिवाय बदल करू शकणार नाहीत. यूआयडीएआयने एका ट्विटमध्ये ही माहिती दिली.

32 कागदपत्रांची यादी

UIDAI च्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका वापरकर्त्याने याबाबत प्रश्न विचारला होता. वापरकर्त्याला आधार कार्डवर दिलेला पत्ता बदलण्याची प्रक्रिया जाणून घ्यायची होती. यावर प्रतिक्रिया देताना यूआयडीएआयने सांगितले की, पुराव्याशिवाय नाव बदलता येत नाही. UIDAI आधार एजन्सीने 32 अपडेट्सचा उल्लेख केला आहे, जो आधार अद्यायवत करण्यासाठी वैध आहेत. नावात बदल करण्यासाठी यापैकी एक कागदपत्र द्यावे लागेल. आता पत्ता पुरावा दिल्याशिवाय नाव ऑनलाईन बदलले जाणार नाही.

आधी संपूर्ण व्यवस्था बदलली

पूर्वी ही सुविधा पत्त्याच्या प्रमाणीकरण पत्राद्वारे उपलब्ध होती. जर कोणाकडे हे वैधता पत्र असेल, तर तो नाव ऑनलाईन बदलू शकतो. आता ही सेवा बंद करण्यात आली. खुद्द UIDAI ने ही माहिती दिली. एजन्सीने इतर कोणतेही वैध पीओए दस्तऐवज वापरून नाव अद्ययावत करण्याचे सांगितले. पहिली प्रणाली यापुढे कार्य करणार नाही. आम्ही नवीन प्रणालीमध्ये नाव कसे अपडेट करू शकतो.

असे करा आधार अपडेट

? सर्वप्रथम UIDAI ssup.uidai.gov.in/ssup/ ची अधिकृत वेबसाईट उघडा ? आता ‘प्रोसीड टू अपडेट’ वर क्लिक करा ? तुमच्या आधारशी संबंधित सर्व माहिती इथे टाका ? येथे दिलेल्या कॅप्चा कोडच्या मदतीने आधार तपशीलांची पडताळणी करा ? आता तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका ? मोबाईल क्रमांकावर मिळालेल्या ओटीपीसह तुमचा फोन नंबर पडताळणी करा ? आता तुमचा आधार कार्ड तपशील टाका आणि नवीन पत्ता टाका ? UIDAI ने नमूद केलेल्या 32 दस्तऐवजांपैकी कोणतेही एक अपलोड करा

संबंधित बातम्या

अवघ्या 10 मिनिटांत बनवा पॅन कार्ड, हातांनी पडताळणी होणार, अशा प्रकारे करा काम

मोठी बातमी! बँकांच्या आधी मोदी सरकार ही विमा कंपनी विकणार

Aadhaar Address Change: The old rule of changing the address on Aadhaar card has changed, learn the new procedure

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.