AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंतवणूकदारांची खाती गोठवल्याची बातमी खोटी, अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण, एका दिवसात 1.03 लाख कोटींचा फटका

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेकडून (NSDL) नुकतीच तीन परदेशी गुंतवणूकदारांवर कारवाई केली गेली असल्याची बातमी आली. या बातमीनंतर देशातील अग्रेसर उद्योजक गौतम अदानी यांच्या कंपन्यांमधील शेअर्स कोसळले.

गुंतवणूकदारांची खाती गोठवल्याची बातमी खोटी, अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण, एका दिवसात 1.03 लाख कोटींचा फटका
गौतम अदानी
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 10:45 PM
Share

मुंबई: राष्ट्रीय शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेकडून (NSDL) नुकतीच तीन परदेशी गुंतवणूकदारांवर कारवाई केली गेली असल्याची बातमी आली. या बातमीनंतर देशातील अग्रेसर उद्योजक गौतम अदानी यांच्या कंपन्यांमधील शेअर्स कोसळले. NSDL ने सील केलेली या तीन फंडांच्या अकाऊंटसमधून अदानी ग्रूपच्या (Adani Group) कंपन्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली होती, अशी बातमी आली. ही बातमी सगळीकडे पोहोचताच अदानी ग्रूपच्या समभागांचे (Share) भाव खाली कोसळले. दुपारनंतर अदानी ग्रुपकडून खाती सील केल्याची बातमी निराधार असल्याचं सांगण्यात आलं. कंपीनकडून 14 जूनपर्यंत कोणत्याही परकीय गुंतवणूकदाराचं डीमॅट अकाऊंट गोठवण्यात आलेलं नाही, असं सांगण्यात आलं. ( Adani Group said reports regarding NSDL freeze three fpi accounts related adani group share is blatantly erroneous)

जाणीवपूर्वक बातमी पेरली गेली

अदानी ग्रुपनं त्यांच्या कोणत्याही परकीय गुंतवणूकदारांची खाती एनएसडीएलंनं गोठवलेली नाहीत, अशी माहिती दिली. अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांवर प्रभाव टाकण्यासाठी ही बातमी पेरली गेली, असा दावा देखील करण्यात आला आहे. अदानी ग्रुपच्या वतीनं कारवाई झाली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, या बातमीमुळं गुंतवणूकदारांच्या नुकसानाबरोबरचं अदानी ग्रुपच्या प्रतिष्ठेला धोका पाहोचला असल्याचं म्हटलं आहे. गुंतवणूकदारांच्या हितासाठी खुलासा करत असल्याचही त्यांच्याकडून सागंण्यात आलं आहे.

अदानी समुहाला फटका

प्राथमिक माहितीनुसार, NSDLकडून काही दिवसांपूर्वी Albula इनवेस्टमेंट फंड, Cresta फंड आणि APMS इनवेस्टमेंट फंड या तीन अकाऊंटसमधील व्यवहार तातडीने बंद करण्यात आले होते. या तीन कंपन्यांनी अदानी ग्रुपमध्ये 43500 कोटी रुपये गुंतवणूक केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. विशेषत: अदानी समूहातील कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.

मार्केट कॅप 10 टक्केंनी घसरली

प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार अदानी ग्रुपची मार्केट कॅप 10 टक्क्यांनी घसरली. त्यांची मार्केट कॅप 1.03 लाख कोटी रुपयांनी घसरली. सोमवारी बाजार बंद झाला त्यावेळी अदानी ग्रुपची मार्केट कॅप 8.9 लाख कोटी रुपये होती. तर, शुक्रवारी शेअर बाजार बंद झाला त्यावेळी अदानी ग्रुपची मार्केट कॅप 9.5 लाख कोटी रुपये होती.

अदानी एन्टरप्रायझेस समभाग 15 टक्क्यांनी घसरुन त्याची किंमत 1361.25 इतकी झाली. तर अदानी पोर्टस अँण्ड इकोनॉमिक झोन कंपनीचा शेअर 14 टक्क्यांनी खाली पडला. अदानी पॉवर 5 टक्के, अदानी ट्रान्समिशन 5 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचा समभागाची किंमतही पाच टक्क्यांनी खाली आली. शेअर बाजार बंद होताना अदानी ग्रुपचे शेअर्स वधारले होते.

संबंधित बातम्या:

शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई; अदानी ग्रूपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले

धमाकेदार ऑफर! 7 लाखांची कार अवघ्या 40 हजारात खरेदीची संधी

( Adani Group said reports regarding NSDL freeze three fpi accounts related adani group share is blatantly erroneous)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.