गौतम अदानी यांचा भूतानसोबत मोठा करार, 6000 कोटींची गुंतवणूक करणार
गौतम अदानी यांची कंपनी अदानी पॉवर आणि भूतानची सरकारी कंपनी ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी एकत्र येत मोठे पाऊल उचलले आहे. या दोन्ही कंपन्यांनी भूतानमधील 570 मेगावॅट क्षमतेच्या वांगचू जलविद्युत प्रकल्पासाठी शेअरहोल्डर करारावर स्वाक्षरी केली आहे.

भारतातील आघाडीचे उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक गौतम अदानी यांनी भूतानसोबत मोठा करार केला आहे. गौतम अदानी यांची कंपनी अदानी पॉवर आणि भूतानची सरकारी कंपनी ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी एकत्र येत मोठे पाऊल उचलले आहे. या दोन्ही कंपन्यांनी भूतानमधील 570 मेगावॅट क्षमतेच्या वांगचू जलविद्युत प्रकल्पासाठी शेअरहोल्डर करारावर स्वाक्षरी केली आहे. यासाठी गौतम अदानी 6000 कोटी रुपये खर्च करणार आहेत.
वांगचू जलविद्युत प्रकल्पाबाबत भूतानच्या सरकारसोबत सवलतीसाठीही एक करार करण्यात आला आहे. हे दोन्ही करार भूतानचे पंतप्रधान दाशो त्शेरिंग तोबगे आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या उपस्थितीत झाले. या दोन्ही करारामुळे अदानी पॉवर आणि डीजीपीसी या कंपन्या बीओओटी मॉडेलवर वांगचू जलविद्युत प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरु करणार आहेत. याचा फायदा भूतानला होणार आहे.
Adani Power and Druk Green Power Corp. Ltd. (DGPC) – Bhutan’s state-owned generation utility, signed the Shareholders Agreement (SHA) for setting up a 570 MW Wangchhu hydroelectric project in the Himalayan Kingdom of Bhutan. An in-principle understanding on the Power Purchase… pic.twitter.com/IBemznzyCC
— ANI (@ANI) September 6, 2025
कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार
अदानी पॉवर वांगचू जलविद्युत प्रकल्पातील अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि संबंधित पायाभूत सुविधांसाठी सुमारे 6000 कोची रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सध्या या प्रकल्पाची आखणी सुरु आहे. 2026 च्या पहिल्या सहामाहीत याचे बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 2031 पर्यंत या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अदानी पॉवरचे सीईओ एसबी ख्याली याबाबत बोलताना म्हणाले की, ‘शाश्वत विकासात भूतान हा देश जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. या अक्षय ऊर्जा प्रकल्पाद्वारे भूतानच्या नैसर्गिक संसाधनांचा विकास करण्यात हातभाक लावण्यास आम्ही उत्सुक आहोत. वांगचू प्रकल्प हिवाळ्यात भूतानची वीज मागणी पूर्ण करेल आणि नंतर उन्हाळ्यात भारताला वीज निर्यात करेल.
ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दाशो छेवांग रिन्झिन यावेळी म्हणाले की, ‘भूतान आणि भारत 1960 पासून जलविद्युत क्षेत्रात एकत्र काम करत आहेत. हा करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल. भूतान 2040 पर्यंत 15000 मेगावॅट जलविद्युत आणि 5000 मेगावॅट सौरऊर्जेची अतिरिक्त क्षमता विकसित करू इच्छित आहे. अदानी समूहाच्या मदतीने हा प्रकल्प जलद पूर्ण होणार आहे. यानंतर आता आगामी काळात दोन्ही कंपन्यांमध्ये इतरही करार होण्याची शक्यता आहे.
