AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani: AI बाजारात स्वस्ताईचे युग? मुकेश अंबानी एआयमध्ये करणार 10 लाख कोटींची गुंतवणूक

India AI Impact Summit 2026 Mukesh Ambani: एआय बाजारात रिलायन्स समूहाची एंट्री होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्वस्ताई येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुकेश अंबानी हे एआयमध्ये 10 लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे समोर आले आहे. काय आहे मोठी अपडेट?

Mukesh Ambani: AI बाजारात स्वस्ताईचे युग? मुकेश अंबानी एआयमध्ये करणार 10 लाख कोटींची गुंतवणूक
मुकेश अंबानी, एआय Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 19, 2026 | 2:51 PM
Share

India AI Impact Summit 2026 Mukesh Ambani: भारत एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मुकेश अंबानी यांनी घोषणा केली आहे की, रिलायन्स जिओने (Jio) देशात डेटा स्वस्त केला आहे. युझर्ससाठी कमी किंमतीत तो उपलब्ध करुन दिला आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेतही, एआयची तंत्रज्ञान सुद्धा स्वस्तात भारतीयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता भाड्याने, किरायाने घेऊ शकत नाही. जिओ देशात इंटरनेट युगानंतर इंटेलिजन्स इरा आणणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. मुकेश अंबानी हे एआयमध्ये 10 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहेत. यावेळी मुकेश अंबानी यांनी Jio AI ची वैशिष्यही सांगितले.

Jio AI करेल भारतीय भाषांमध्ये काम

मुकेश अंबानी म्हमाले की जिओ AI, भारतीय भाषांमध्ये काम करेल. त्यामुळे शेतकरी, तरुण, विद्यार्थी आणि छोट्या व्यावसायिक हे त्यांच्या भाषेत एआयचा वापर करू शकतील. ही गोष्ट लक्षात ठेवत कंपनीने शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षण AI, आरोग्य AI, कृषी क्षेत्रासाठी आणि सर्वसामान्यासाठी भारत IQ सारखे प्लॅटफॉर्म बाजारात आणेल. हे प्लॅटफॉर्म स्थानिक भाषांमध्ये AI बेस्‍ड सॉल्‍यून्शस उपलब्ध करुन देतील.

AI-रेडी डेटा सेंटर पार्क

मुकेश अंबानी यांनी सांगितले की, कंपनी जामनगरमध्ये टप्प्याटप्प्याने मल्टि गीगावॅट AI-रेडी डेटा सेंटर पार्क विकसीत करेल. 2026 च्या अखेरपर्यंत 120 मेगावॅट क्षमतेसह हा प्रकल्प सुरू होईल. त्यामुळे गीगावॅट अधिक व्यापक होईल. विशेष म्हणजे हा प्रकल्प अक्षय ऊर्जेवर, Green Energy वर सुरू असेल. यामुळे देशभरात जलदगतीने एआयवर अनेक काम करणे सोपे होईल. शाळा, दुकानं, रुग्णालयं आणि कृषी क्षेत्रासाठी विशेष सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल.

21 व्या शतकात भारत होणार AI शक्ती

मुकेश अंबानी यांनी विश्वास व्यक्त केला की, भारत 21 व्या शतकात AI शक्ती केंद्र असेल. त्यासाठी एआयची सुविधा सुकर आणि जलदगतीने आणि सहज वापरण्याजोगी हवी असे मत त्यांनी मांडले. कंपनी आता एआयमध्ये मोठी मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. हे तंत्रज्ञान सहज आणि उच्च दर्जाचे असावे यासाठी रिलायन्स जिओ पायाभूत सुविधेसह मोठा प्रकल्प उभारणार आहे.

10 लाख कोटींची गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि उद्योपती मुकेश अंबानी यांनी India AI Impact Summit 2026 मध्ये मोठी घोषणा केली. जिओ आणि रिलायन्स इंडस्ट्रीज मिळून येत्या 7 वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तर ही काही सट्टेबाजी नाही तर भारताच्या एआय भविष्यासाठीची मोठी गुंतवणूक असल्याचे म्हटले आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...