बँकांबरोबरच NBFC देते गृहकर्ज, लगेच जाणून घ्या
बँकांबरोबरच एनबीएफसीही चांगल्या व्याजदराने गृहकर्ज देतात. आज आम्ही तुम्हाला देशातील NBFC च्या गृहकर्जाच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

तुम्ही गृहकर्ज घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा. बँकांबरोबरच बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या म्हणजेच एनबीएफसीकडूनही लोकांना गृहकर्ज दिले जाते, याविषयी तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर चिंता करू नका. याविषयीची माहिती आम्ही पुढे विस्ताराने देत आहेत, ही माहिती जाणून घ्या.
स्वत:चे घर विकत घेणे हे जवळजवळ प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतु हल्ली प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडत आहेत. अशा तऱ्हेने अनेक जण आता बँकेकडून कर्ज घेऊन घरे खरेदी करत आहेत. देशातील विविध बँकांकडून वेगवेगळ्या व्याजदराने गृहकर्ज दिले जाते.
बँकांबरोबरच बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या म्हणजेच एनबीएफसीकडूनही लोकांना गृहकर्ज दिले जाते. अशापरिस्थितीत तुम्ही इच्छित असाल तर बँकांव्यतिरिक्त एनबीएफसीकडूनही गृहकर्ज घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला देशातील एनबीएफसीच्या गृहकर्जाच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
बजाज फिनसर्व्ह
बजाज फिनसर्व्ह आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या व्याजदराने गृहकर्ज देते. कंपनीचा गृहकर्जाचा व्याजदर 7.35 टक्क्यांपासून सुरू होतो. हा व्याजदर तुमचा क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम आणि उत्पन्नानुसार बदलू शकतो.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स
एलआयसी हाऊसिंग फायनान्सचा गृहकर्जाचा व्याजदरही आकर्षक आहे. चांगला क्रेडिट स्कोअर मिळाल्यास येथे 7.50 टक्क्यांपासून सुरू होणाऱ्या व्याजदराने गृहकर्ज मिळू शकते.
टाटा कॅपिटल
टाटा कॅपिटल देखील एक एनबीएफसी आहे, जी आपल्या ग्राहकांना चांगल्या व्याजदराने गृहकर्ज देते. टाटा कॅपिटलचा गृहकर्जाचा व्याजदर 7.75 टक्के आहे.
पीएनबी हाउसिंग फायनान्स
पीएनबी हाउसिंग फायनान्सच्या गृहकर्जाच्या व्याजदरांबद्दल बोलायचे झाले तर या कंपनीच्या गृहकर्जाचा सुरुवातीचा व्याजदर 8.25 टक्क्यांपासून सुरू होतो.
पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स
पिरामल कॅपिटल कंपनीच्या गृहकर्जाचे व्याजदर 9.50 टक्क्यांपासून सुरू होतात. क्रेडिट स्कोअरनुसार हे व्याजदर बदलू शकतात.
‘या’ चुका टाळा
फालतू खर्च कमी करा
बजेटच्या बाहेर घर किंवा गाडी खरेदी करणे, दर आठवड्याला मित्रांसोबत फिरायला जाणे किंवा दर आठवड्याला बाहेर खाणे लोक जास्त दाखवतात. या सर्व गोष्टी श्रीमंत होण्यापासून रोखतात. फालतू खर्च कमी करा.
क्रेडिट कार्डचा गैरवापर
बहुतेक लोक क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्ज आहे हे जाणून क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्डचे फायदे असले तरी वेळेवर बिले न भरल्यामुळे किंवा क्रेडिट कार्डने मोठा खर्च केल्याने तुम्हाला जास्त व्याज दर भरावा लागू शकतो.
खर्चावर चांगले नियंत्रण
रोजच्या UPI व्यवहारांसाठी स्वतंत्र बँक खाते वापरल्यास महिन्याला किती आणि कुठे खर्च केला याचे स्पष्ट चित्र आपल्याला मिळते. यामुळे गोंधळाशिवाय बजेट तयार करता येते आणि अनावश्यक खर्च टाळता येतो.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
