कोण आहेत OpenAI च्या नवीन सीईओ मीरा मूर्ती? भारताशी असं आहे नाते

OpenAI Meera Murthy | चॅटजीपीटीचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आणि मीरा मूर्ती यांच्या खांद्यावर सीईओची जबाबदारी आली आहे. मीरा मूर्ती या 2018 मध्ये ओपनएआय कंपनीत रुजू झाल्या. मीरा यांनी कॅनाडात शिक्षण घेतले. त्या एक मॅकेनिकल इंजिनिअर आहेत.

कोण आहेत OpenAI च्या नवीन सीईओ मीरा मूर्ती? भारताशी असं आहे नाते
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 3:49 PM

नवी दिल्ली | 18 नोव्हेंबर 2023 : चॅटजीपीटीचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांना कंपनीच्या बोर्डाने नोकरीवरुन कमी केले आहे. कंपनीची जबाबदारी मीरा मूर्ती यांच्या खाद्यांवर आहे. त्या अंतरिम सीईओ म्हणून कमान संभाळतील. मीरा 2018 मध्ये टेस्ला कंपनी सोडल्यानंतर ओपनएआयमध्ये (चॅटजीपीटीची मूळ कंपनी) दाखल झाल्या. मूर्ती या पदासाठी योग्य उमेदवार असल्याचा दावा कंपनीच्या बोर्डाने केला आहे. ओपनएआयने याविषयीचे निवदेन प्रसिद्धीला दिले. त्यानुसार चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मीरा मूर्ती यांना अंतरिम सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कंपनी या पदासाठी सीईओचा शोध घेत आहे. चॅटजीपीटीची सुरुवात करण्यामागे मीरा मूर्ती यांचाच हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मूर्ती यापूर्वी कृत्रिम बुद्धीमतेवर आधारीत चॅटबॉट चॅटजीपीटी तयार करणारी कंपनी OpenAI ची चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर (CTO) होती. चॅटजीपीटीमागे त्यांचेच डोके असल्याचा दावा करण्यात येत आहे.

कोण आहे मीरा मूर्ती

मीरा मूर्ती (Mira Muraty) यांचा जन्म 1988 मध्ये अल्बानिया येथे झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचे आई-वडिल भारतीय होते. त्यांचे शिक्षण कॅनाडामध्ये झाले. त्या एक मॅकेनिकल इंजिनिअर आहेत. मीरा ने टेस्लामध्ये काम केले. मॉडल एक्स टेस्ला कार तयार करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. 2018 मध्ये त्या चॅटजीपीटीची मूळ कंपनी ओपन एआईमध्ये रुजू झाल्या. त्यांना गेल्या वर्षी ओपनएआयचे सीटीओ (CTO) म्हणून जबाबादारी देण्यात आली होती. टाईम्स पत्रिकाला दिलेल्या मुलाखतीत मीरा यांनी चॅटजीपीटीच्या चुकीच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटले. त्याची मोठी चर्चा रंगली. सोशल मीडियावर त्यांच्या सुंदरतेची पण स्तूती होत असते.

हे सुद्धा वाचा

या कंपन्यांमध्ये केले काम

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूर्ती यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 2011 मध्ये झाली. त्यांनी गोल्डमॅन सॅशमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर 2012 ते 2013 पर्यंत त्यांनी जोडियक एअरोस्पेसमध्ये काम केले. त्यानंतर टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीत त्यांनी काम केले. 2018 मध्ये मीरा या OpenAI मध्ये दाखल झाल्या.

एक बाहेर, एक जाणार

चॅटजीपीटीचे सीईओ आणि सहसंस्थापक सॅम ऑल्टमन यांच्यावर बोर्ड नाराज होते. विचार विनिमयानंतर कंपनीच्या बोर्डाने त्यांना पदावरुन हटविण्याचा निर्णय घेतला. ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी बोर्डाचे अध्यक्षपद सोडणार असल्याचे जाहीर केले. कंपनीत अनेक प्रतिभावान लोकांसोबत कामाचा चांगला अनुभव आल्याचे ट्विट ब्रॉकमन यांनी केले. ओपनआयला एकापाठोपाठ दोन झटके बसले आहेत.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.