‘कोणीही होऊ शकते करोडपती’; Robert Kiyosak यांनी थेट फॉर्म्युलाच सांगितला, तुमच्याकडे हवी केवळ ही गोष्ट
anyone can rich : तर जगात काही अशक्य नाही भावा. गावाकडे पण अनेकजण सहज लाखभर छापतात, अर्थात चांगल्या मार्गाने कमाई करतात. तर लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी कोणीही करोडपती होऊ शकतं असं दावा केला आहे.

श्रीमंती ही कोणाची मक्तेदारी नाही. कोणीही श्रीमंत होऊ शकते. प्रत्येकाचे श्रीमंत होण्याचे स्वप्न असतेच की. पण प्रत्येक जण काही श्रीमंत होत नाही. रिच डॅड पुअर डॅड या सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी, कोणीही करोडपती होऊ शकते, असा दावा केला आहे. त्यासाठी केवळ ही गोष्ट करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कियोसाकी नेहमी लोकांना सोने, चांदीसह इतर ठिकाणी गुंतवणुकीचा सल्ला देतात. पण यावेळी त्यांनी बिटकॉईनवर डाव लावला आहे. त्यांच्या मते, या ठिकाणी जो गुंतवणूक करेल, भविष्यात तो श्रीमंत असेल.
बिटकॉईन करेल श्रीमंत
तर कियोसाकी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून (आताचे एक्स) गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी सोने-चांदीला दूर सारून केवळ बिटकॉईनवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या मते, श्रीमंत होण्यासाठी बिटकॉईनमधील गुंतवणूकच पुरेशी आहे. या माध्यमातून कोणीही करोडपती होऊ शकते. तुमचा पण विश्वास बसणार नाही, पण भविष्यासाठी आताच बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करा. त्यावेळी तुम्हाला माहिती होईल की, श्रीमंत होणं किती सोप्पं आहे. ही अशी गुंतवणूक आहे की, एकदा तुमचं लक्ष्य निश्चित करा. त्यात तशी गुंतवणूक करत राहा आणि तुमचा पैसा वाढताना पाहा, असे कियोसाकी म्हणाले.
रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक धोक्याची
रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते, बिटकॉईन हे सध्याचे गुंतवणुकीचे सर्वात चांगले साधन आहे. भविष्यात श्रीमंत होण्याची ही किल्ली आहे. मी माझे पहिली दशलक्ष कमाई ही बिटकॉईन नाही तर रिअल इस्टेटमधून केली होती. पण त्यासाठी मोठी जोखीम पत्कारावी लागली होती. या गुंतवणुकीतून कमाईसाठी मोठी मेहनत करावी लागली. दशलक्ष कमवण्यासाठी मला खूप वेळ लागला. अनेकदा रात्रीचा दिवस करावा लागला. पैसा कमवण्यासाठी मोठा ताण सहन करावा लागला.
पण आता इतकी मेहनत करण्याची गरज नाही. करोडपती होणे आता सोपे आहे. सातोशी याने बिटकॉईनचे मस्त मॉडेल आणले आहे. मी पण सुरुवातीला संशोधन केले. काही दिवस थोडे थोडे डॉलर गुंतवले आणि मग त्याचा चमत्कार पाहिला. पुढे तर मी ठराविक गुंतवणूक सुरू केली. पुढे मी कामात सर्व विसरलो. नंतर लक्षात आल्यावर माझी गुंतवणूक कित्येक डॉलरची झाली होती.
महत्त्वाची सूचना : हा रॉबर्ट कियोसाकी यांनी दिलेला सल्ला आहे. अशा प्रकारची कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही स्वतः अभ्यास करा. तज्ज्ञांचा सल्ला तर आवश्य घ्या. डोळे झाकून कोणतीही गुंतवणूक नक्कीच करू नका.
