मध्यरात्री अज्ञात व्यक्ती आली, दुचाकी पेटवली आणि पळून गेली!

भिवंडी : भिवंडी शहरातील रावजी नगर या परिसरात आयशा इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली आहे. यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील दोन महिन्यात भिवंडी शहरात दुचाकींना आगी लावण्याच्या घटनामध्ये कमालीची वाढ झाली असून, दोन महिन्यातील ही सहावी घटना आहे. यामध्ये …

मध्यरात्री अज्ञात व्यक्ती आली, दुचाकी पेटवली आणि पळून गेली!

भिवंडी : भिवंडी शहरातील रावजी नगर या परिसरात आयशा इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली आहे. यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील दोन महिन्यात भिवंडी शहरात दुचाकींना आगी लावण्याच्या घटनामध्ये कमालीची वाढ झाली असून, दोन महिन्यातील ही सहावी घटना आहे. यामध्ये अज्ञाताने लावलेल्या आगीत सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. नुकतेच काल ठाण्यातही दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे.

शांतिनगर पोलीस  स्टेशनच्या हद्दीतील रावजी नगर येथे आयशा नावाची इमारत आहे. येथे राहणाऱ्यांच्या दुचाकी या इमारतीच्या पार्किंगमध्ये असतात. मध्यारात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाने या दुचाकी जाळून टाकल्या, दुचाक्यांना आग लागल्यामुळे इमारतीच्या पार्किंगमध्ये आगीचे लोळ दिसू लागल्यानंतर ही दुर्घटना नागरिकांच्या लक्षात आली. आरडाओरड करीत नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग पसरत त्याची झळ सहा दुचाकींना लागल्याने स्थानिकांनी अग्निशामन दलाला पाचारण केलं. मात्र, त्याआधीच सहा दुचाकी जळुन खाक झाल्या.

दोन अर्धवट जळालेल्या दुचाकी वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेची माहिती मिळताच शांतिनगर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करीत दुचाकी जाळण्याऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे.  याप्रकरणी शांतिनगर  पोलीस ठाण्यात अज्ञात  इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *