ATF Price Hike : विमान प्रवास महागणार! Jet Fuel च्या किंमतीमध्ये 5 टक्के वाढ

Jet Fuel Price Hike : दर महिन्यात दोन वेळा जेट फ्युएलचे दर जारी केले जातात.

ATF Price Hike : विमान प्रवास महागणार! Jet Fuel च्या किंमतीमध्ये 5 टक्के वाढ
विमान प्रवास महागण्याची शक्यताImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 9:51 AM

विमान (Air Travel) प्रवास करणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या काळात विमान प्रवास महागणार आहे. कारण जेट् फ्युएलच्या (ATF Price Hike) किंमतीत वाढ करण्यात आली आहे. 5 टक्क्यांनी जेट फ्युएलच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता याचा थेट परिणाम विमान प्रवासाच्या तिकीटदरांवर पाहायला मिळेल. सलग दहाव्यांदा जेट फ्युएलच्या किंमती वाढल्या आहेत. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या आओसी म्हणजेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून (IOC) 16 मे रोजी विमान इंधनाचे दर जारी केले. या वेळी जारी करण्यात आलेल्या दरात वाढ करण्यात आली. 6,188 रुपये प्रति किलोलीटर इतकी भाववाड आयओसीकडून करण्यात आली आहे. विमान इंधनाचे दर सलग दहाव्यांदा वाढले आहे. आता जारी करण्यात आलेले दर हे 31 मे पर्यंत लागू असणार आहेत. एकीकडे विमान वाहतूक महागली असली, तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही वाढ करण्यात आलेली नाही.

कुठे किती दर?

दरम्यान, विमान इंधनाचा दर कुठे नेमका किती आहे, हे खालील आकडेवारीतून जाणून घेऊयात…

  1. दिल्लीमध्ये एअर टरबाईन फ्यूएलचा दर 1,23,039.71 रुपये प्रति किलोलीटर
  2. कोलकातामध्ये एअर टरबाईन फ्यूएलचा दर 127,854.60 रुपये प्रति किलोलीटर
  3. हे सुद्धा वाचा
  4. मुंबईमध्ये एअर टरबाईन फ्यूएलचा दर 121,847.11 रुपये प्रति किलोलीटर
  5. चेन्नईमध्ये एअर टरबाईन फ्यूएलचा दर 127,286.13 रुपये प्रति किलोलीटर

आता विमान तिकीट महागणार?

जेट फ्युएलचे दर वाढल्याचा थेट परिणाम आता विमान प्रवासावर होणार आहे. विमानानं प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. येत्या काळात विमान प्रवासास महागण्याची चिन्हा आहेत. सलग दहा वेळा इंधनाचे दर हे वधारले असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे विमान कंपन्यांना आता तिकीट दर वाढवण्याची शक्यता नाकारात येत नाही.

2022 या वर्षभरात जेट फ्यूएलची किंमत तब्बल 61.7 टक्के इतकी वाढली आहे. 1 जानेवारी 2022 पासून इंधनाचे दर 46,938 इतके वाढले आहे. 1 जानेवारीला जेट फ्युएलचा दर 76 हजार 62 रुपये प्रति किलोलीटर इतका होता. हाच दर आता 1 लाख 23 हजार प्रति कोलोलीटर इतक झालाय.

दर महिन्यात दोन वेळा जेट फ्युएलचे दर जारी केले जातात. दर महिन्याच्या पहिल्या आणि सोळा तारखेला हवाई वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे दर घोषित केले जातात..

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.