…तर पीएफ खाते बंद होणार! पैसे काढतानाही होऊ शकते अडचण

एकदा खाते निष्क्रिय झाल्यावर त्याला नियोक्त्याकडून सर्टिफाईड करावे लागते आणि ज्या कर्मचाऱ्यांची कंपनी बंद झाली आहे अशा कर्मचार्‍यांकडून केवायसीच्या कागदपत्रांच्या आधारे ते प्रमाणित केले जाऊ शकते. (Avoid this mistake otherwise PF account will be closed, There will be difficulty in withdrawing money)

...तर पीएफ खाते बंद होणार! पैसे काढतानाही होऊ शकते अडचण
हा 12 अंकी खास नंबर गमावल्यास थांबू शकते पेन्शन

नवी दिल्ली : जोपर्यंत आपल्याला पैशांची निकडीची गरज लागत नाही तोपर्यंत आपण आपल्या पीएफ खात्याबद्दल जास्त विचार करत नाही. अनेक केसेसमध्ये व्यक्ती नोकरी बदललात मात्र पीएफच्या जुन्या खात्यातून नवीन खात्यात पैसेही ट्रान्सफरच करीत नाहीत. परंतु असे केल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. असे बरेच नियम आहेत, ज्याची माहिती नसल्यामुळे आपले पीएफ खाते निष्क्रिय केले जाऊ शकते. आपल्याला लक्षातही येणार नाही आणि आपले पीएफ खाते बंद होऊ शकते. यासाठीच पीएफ खाते बंद होणे आणि त्यानंतर त्यातून पैसे काढण्यासंबंधित नियम माहित असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपण आपले पैसे वाचवू शकता आणि गरजेच्या वेळी ते सहजपणे काढू शकता. (Avoid this mistake otherwise PF account will be closed, There will be difficulty in withdrawing money)

कसे बंद होऊ शकते आपले खाते?

मनी 9 च्या अहवालानुसार, जर आपली जुनी कंपनी बंद झाली असेल आणि आपण नवीन कंपनीच्या खात्यावर आपले पैसे हस्तांतरित केले नाहीत, तर आपल्यासाठी हे अवघड होऊ आहे. तसेच, जर खात्यात 36 महिन्यांपर्यंत कोणतेही व्यवहार झाले नाहीत तर नियमांनुसार आपले खाते आपोआप बंद होते. या अहवालानुसार ईपीएफओच्या नियमांनुसार अशी खाती निष्क्रिय वर्गात आणली जातात. म्हणजे, आपण किंवा आपल्या कंपनीने त्यात भविष्य निर्वाह निधी (योगदान) जमा केले नाही, त्यानंतर ते बंद केले गेले.

कसे होईल खाते सक्रिय?

एकदा खाते निष्क्रिय झाल्यावर, एका प्रक्रियेद्वारे खाते सक्रिय करावे लागेल, ज्यासाठी आपल्याला ईपीएफओशी संपर्क साधावा लागेल. तथापि, आपण काळजी करु नका, आपले पैसे आपल्याला परत मिळतील. मात्र या प्रक्रियेत खूप समस्या असतात. एकदा खाते निष्क्रिय झाल्यावर त्याला नियोक्त्याकडून सर्टिफाईड करावे लागते आणि ज्या कर्मचाऱ्यांची कंपनी बंद झाली आहे अशा कर्मचार्‍यांकडून केवायसीच्या कागदपत्रांच्या आधारे ते प्रमाणित केले जाऊ शकते.

जमा केलेल्या पैशांवर व्याज मिळते का?

यापूर्वी या खात्यावर कोणतेही व्याज मिळत नव्हते. तथापि, 2016 मध्ये नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली होती आणि आता या खात्यावर व्याज दिले जाते. आपले पैसे काढण्यासाठी पीएफ अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर आपल्याला आपले पैसे मिळतात. यामध्ये पीएफ अधिकार्‍यांची रँक पैशाच्या आधारावर निश्चित केलेली आहे आणि या रँकच्या आधारे ते ही प्रकरणे निकाली काढतात. (Avoid this mistake otherwise PF account will be closed, There will be difficulty in withdrawing money)

इतर बातम्या

Jimmy Shergill Arrested | कोरोनाचे नियम मोडले, अभिनेता जिमी शेरगिलला लुधियानात अटक!

Recurring Deposit Rates: RD मध्ये गुंतवणूक करायचीय, मग इथे मिळणार सर्वोत्तम व्याज

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI