AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अॅक्सिस बँकेच्या खातेधारकांना 1 मेपासून झटका, बँकेच्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ होणार

अ‍ॅक्सिस बँकेने दरमहा विनामूल्य मर्यादेनंतर एटीएममधून पैसे विड्रॉलवरील शुल्क वाढविले आहे. याशिवाय एसएमएस शुल्कात देखील आणखी वाढ केली आहे. (Axis Bank account holders will be hit from May 1, the bank's service charge will increase)

अॅक्सिस बँकेच्या खातेधारकांना 1 मेपासून झटका, बँकेच्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ होणार
LGBTQIA साठी अॅक्सिस बँकेचा नवा नियम
| Updated on: Apr 28, 2021 | 3:45 PM
Share

नवी दिल्ली : आपले अ‍ॅक्सिस बँकेत पगार किंवा बचत खाते असल्यास, ही बातमी फक्त आपल्यासाठी आहे. या खासगी क्षेत्रातील बँकेने बचत खात्यावर अनेक प्रकारचे शुल्क वाढविले आहे. हे नवीन शुल्क 1 मेपासून लागू करण्यात येणार आहे. अ‍ॅक्सिस बँकेने दरमहा विनामूल्य मर्यादेनंतर एटीएममधून पैसे विड्रॉलवरील शुल्क वाढविले आहे. याशिवाय एसएमएस शुल्कात देखील आणखी वाढ केली आहे. एसएमएस शुल्क नियम 1 जुलैपासून लागू होतील. (Axis Bank account holders will be hit from May 1, the bank’s service charge will increase)

कॅश विड्रॉल चार्जेस

अ‍ॅक्सिस बँक दरमहा 4 एटीएम ट्रान्झेक्शन किंवा 2 लाख रुपयांचे ट्रान्झेक्शन मोफत देते. यानंतर, अतिरिक्त व्यवहारांवर शुल्क द्यावे लागते. प्रति 1000 रुपयावर 5 रुपये शुल्क लावला जातो. परंतु 1 मेपासून आता ग्राहकांना 1000 रुपये कॅश विड्रॉलसाठी 10 रुपये द्यावे लागतील.

मिनिमम बँलन्स नियमातही बदल

अ‍ॅक्सिस बँकेने पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 मे 2021 पासून किमान सरासरी शिल्लक मर्यादा वाढविली आहे. मेट्रो शहरांतील अ‍ॅक्सिस बँकेच्या सुलभ बचत योजनेसाठी किमान शिल्लक रक्कम 10,000 रुपयांवरून 15,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. हे सर्व देशांतर्गत आणि एनआरआय ग्राहकांना लागू असेल.

मेट्रो शहर

अ‍ॅक्सिस बँकेने प्राइम व्हेरिएंट खात्यासाठी किमान शिल्लक मर्यादा सुधारीत करीत 25,000 रुपये किंवा किमान 1 लाख रुपये मुदत ठेव केली आहे. प्राईम व्हेरिएंट बँक खात्यांमध्ये डिजिटल प्राईम, सेव्हिंग्ज डोमेस्टिक आणि नॉन-रेसिडेन्ट प्राईम आणि लिबर्टी स्कीमच्या खात्यांचा समावेश असेल. 1 मे 2021 पासून याची अंमलबजावणी होईल.

अर्ध-शहरी क्षेत्र

अर्ध-शहरी भागात पूर्वी प्राइम अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना किमान मुदत ठेव 15,000 किंवा 1 लाख रुपये टर्म डिपॉझिट ठेवणे आवश्यक होते. आता यामध्ये वाढ करीत 25,000 रुपये किंवा मुदत ठेव 1 लाख रुपये करण्यात आली आहे. त्याच वेळी, लिबर्टी स्कीम खाते असलेल्या ग्राहकांना आधी 15,000 रुपये मासिक ठेवावे लागत होते किंवा त्यांना दरमहा 25,000 रुपये खर्च करावे लागत होते. आता ही मर्यादा 25 हजार रुपये मासिक करण्यात आली आहे किंवा तीच रक्कम दरमहा खर्च करावी लागेल.

ग्रामीण भाग

ग्रामीण भागात मुख्य खातेधारकांना आधी मासिक 15,000 किंवा 1 लाख रुपये मुदत ठेव ठेवणे बंधनकारक होते. आता ही मर्यादा 25 हजार रुपये मासिक करण्यात आली आहे. तर लिबर्टी योजनेतील खातेदारांना आता 15,000 ऐवजी 25,000 रुपये मेंटेन करावे लागतील किंवा दरमहा 25,000 रुपये खर्च करावा लागणार आहेत.

किती दंड भरावा लागेल?

खात्यात किमान शिल्लक मेंटेन न करणार्‍या ग्राहकांना बँकेने किमान दंड 150 रुपये होता, आता यात घट करुन तो 50 रुपये केला आहे. हे सर्व लोकेशन अकाऊंट्ससाठी लागू असेल.

​SMS चार्जेस

सध्या अ‍ॅक्सिस बँकेत एसएमएस शुल्क दरमहा 5 रुपये आहे. दर तीन महिन्यांनी ग्राहकांच्या बँक खात्यातून 15 रुपये वजा केले जातात. 30 जूनपर्यंत त्यांना फक्त 15 रुपये द्यावे लागतील. परंतु 1 जुलैपासून याची किंमत प्रति एसएमएस 25 पैसे लागणार आहेत. पण कोणत्याही एका महिन्यात 25 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले जाणार नाही. यात ओटीपीसाठी ग्राहकांना पाठविलेले एसएमएस किंवा प्रोमोशनल एसएमएसचा समावेश नसेल. प्रीमियम खाती, पगार खाती आणि मूलभूत खात्यांसाठी हे शुल्क भिन्न आहेत. (Axis Bank account holders will be hit from May 1, the bank’s service charge will increase)

इतर बातम्या

मोठी बातमी, 22 लाख शेतकऱ्यांकडून केंद्राची 43 हजार कोटी रुपयांच्या गव्हाची खरेदी

राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपे यांचं मोठं विधान

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.