रामदेव बाबांच्या ‘या’ कंपनीवर 3,375 कोटी रुपयांचं कर्ज, बालकृष्ण आणि भाऊ जामिनदार, गुंतवणुकदारांवर काय परिणाम?

मागील काही दिवसांपासून रामदेव बाबांची (Baba Ramdev) रुची सोया ही कंपनी चांगलीच चर्चेत आहे. ही कंपनी आपले शेअर्स विकून 4,300 कोटी रुपये (Ruchi Soya FPO) निधी FPO च्या माध्यमातून उभे करणार आहे.

रामदेव बाबांच्या 'या' कंपनीवर 3,375 कोटी रुपयांचं कर्ज, बालकृष्ण आणि भाऊ जामिनदार, गुंतवणुकदारांवर काय परिणाम?


नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून रामदेव बाबांची (Baba Ramdev) रुची सोया ही कंपनी चांगलीच चर्चेत आहे. ही कंपनी आपले शेअर्स विकून 4,300 कोटी रुपये (Ruchi Soya FPO) निधी FPO च्या माध्यमातून उभे करणार आहे. यामुळे गुंतवणुकदारांना मोठी संधी असेल असं बोललं गेलं. मात्र, आता रुची सोयाच्या या निर्णयामागील खरं कारण समोर आलंय. या कंपनीवर सध्या 3,375 रुपयांचं कर्ज आहे. त्याचाच भाग म्हणून कंपनीला 2025 पर्यंत 824 कोटी आणि 2029 पर्यंत 1553 कोटी रुपये फेडावे लागणार आहेत. विशेष म्हणजे या कर्जाला स्वतः रामदेव बाबा यांचा भाऊ आणि शिष्य बालकृष्ण हेच जामिनदार आहेत (Baba Ramdev company Ruchi Soya have to pay 3375 crore rupees bank loan).

फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) बाबत रुची सोया कंपनीने DRHP कडे परवानगी देखील मागितली आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर शेअर्स विकून पैसे उभे करण्याचा रुची सोयाचा मार्ग मोकळा होणार आहे. रुची सोया कंपनीचा पतंजलीने ताबा घेतला त्यावेळी बँकांकडून हे कर्ज घेण्यात आलं होतं.

दुसरीकडे रुची सोयाचे 98.90 टक्के शेअर्स प्रमोटर्सकडेच असल्यानं देखील कंपनीला सेबीच्या नियमानुसार कमीत कमी 25 टक्के शेअर्स गुंतवणुकदारांना विकणं बंधनकारक आहे. त्यामुळेही FPO आणण्याचा निर्णय रुची सोयाने घेतल्याचं सांगितलं जातंय. सेबीच्या नियमाप्रमाणे प्रमोटर स्वतःकडे 75 टक्क्यांपेक्षा अधिक शेअर्स ठेऊ शकत नाही.

कोणकोणत्या प्रमोटर्सने पर्सनल गॅरंटी दिलीय?

रुची सोयाला कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बॅक ऑफ इंडिया, कॅनरा बॅक आणि इंडियन बॅकचा समावेश आहे. हे कर्ज घेण्यासाठी आचार्य बालकृष्ण, बाबा रामदेव यांचे भाऊ राम भरत आणि स्नेहलता भरत यांनी पर्सनल गॅरंटी (व्यक्तिगत हमी/जामीन) दिली होती. हे तिघे देखील कंपनीचे प्रमोटर्स देखील आहेत. आचार्य बालकृष्ण यांच्याकडे कंपनीची 98.54 टक्के भागिदारी आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कंपनी दिवाळखोरीत निघाली तर जामीनदारांच्या संपत्तीतून वसूली

नुकताच सुप्रीम कोर्टाने एक निकाल देताना एखादी कंपनी कर्ज फेडण्यास सक्षम नसेल तेव्हा कर्जासाठी जामीन असलेल्या व्यक्ती किंवा संस्थाच्या संपत्तीतून कर्जवसूली करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे रुची सोयाने हे कर्ज न फेडल्यास बाळकृष्ण आणि रामदेव बाबा यांच्या भावावर कायदेशीर प्रक्रिया राबवल्या जाण्याचाही धोका वर्तवला जात आहे.

हेही वाचा :

3 वर्षात तब्बल 9600 टक्क्यांचा बंपर फायदा देणारी रामदेव बाबांची कंपनी, पुन्हा एकदा गुंतवणुकीची संधी

विना डिग्रीच्या डॉक्टरवर कारवाई करा; रामदेव बाबांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

एलोपॅथीवर टिप्पणी करणारे रामदेव बाबाही होते रुग्णालयात दाखल!, आचार्य बालकृष्ण यांनीही घेतले एलोपॅथी उपचार!

व्हिडीओ पाहा :

Baba Ramdev company Ruchi Soya have to pay 3375 crore rupees bank loan

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI