AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी बॅडन्यूज, EMI आणि कर्जाचे हप्ते वाढणार

HDFC Bank Loan : एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतलेल्या लोकांना फटका बसणार आहे. कारण बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. ज्या लोकांनी या बँकेकडून कर्ज घेतले आहे अशा लोकांचा इएमआय आणि हप्ता वाढणार आहे. बँकेने किती टक्क्यांनी वाढ केली आहे जाणून घ्या.

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी बॅडन्यूज, EMI आणि कर्जाचे हप्ते वाढणार
| Updated on: Feb 07, 2024 | 8:49 PM
Share

Interest Rate increase : HDFC बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने MCLR च्या सीमांत खर्चात 0.10 टक्क्याने वाढ केली आहे. हे नवे दर 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. बँकेने त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. MCLR हा किमान व्याजदर आहे ज्यावर बँका त्यांच्या ग्राहकांना कर्ज देतात. HDFC बँकेचा MCLR 8.90 टक्के ते 9.35 टक्के दरम्यान आहे. आता तो MCLR 8.80 टक्क्यांवरून 8.90 टक्के करण्यात आला आहे. एका महिन्याचा MCLR 8.85 टक्क्यांवरून 8.90 टक्के झाला आहे. तीन महिन्यांचा MCLR 9 टक्क्यांवरून 9.10 टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा MCLR 9.30 टक्के करण्यात आला आहे. बहुतांश ग्राहकांना लागू असलेला एक वर्षाचा MCLR ९.२५ टक्क्यांवरून ९.३० टक्के करण्यात आला आहे. 3 वर्षांचा MCLR 9.35 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

1. कर्जाच्या खर्चात वाढ

MCLR वाढल्यामुळे कर्जाचे व्याजदरही वाढणार आहेत. त्यामुळे कर्ज घेतलेल्या ग्राहकांना अधिक व्याज द्यावे लागणार आहे. यामुळे मासिक हप्ते वाढतील. नवीन कर्ज घेणे महागणार आहे.

2. नवीन कर्ज घेणे कठीण होते

वाढलेल्या व्याजदरामुळे ज्यांना कर्ज घ्यायचे आहे त्यांना कर्ज घेणे कठीण होऊन जाते. क्रेडिट स्कोअर किंवा उत्पन्न कमी असेल अशा लोकांना लोन घेताना अडचणी येतात.

3. घरगुती खर्चावर परिणाम

MCLR वाढला की, मग कर्जाची किंमत देखील वाढते. त्यामुळे लोकांकडे खर्च करण्यासाठी कमी पैसे राहतात. यामुळे घरातील खर्चावर नियंत्रण आणावे लागते.

MCLR वाढल्याने बँकांच्या नफ्यात वाढ होते. MCLR वाढल्यामुळे सरकारचा कर महसूल देखील वाढू शकतो. याचा अर्थ सार्वजनिक सेवांवर खर्च करण्यासाठी सरकारकडे अधिक पैसे येतात.

भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.