AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळं कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ‘ही’ कंपनी 2 वर्षांचा पगार देणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही करणार

काही खासगी कंपन्यादेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत आहेत. Bajaj Auto employees Corona

कोरोनामुळं कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास 'ही' कंपनी 2 वर्षांचा पगार देणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही करणार
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 13, 2021 | 3:19 PM
Share

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून कोरोनाशी लढत आहेत. काही खासगी कंपन्यादेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत आहेत. भारतातील नामांकित उद्योगसमूह बजाज ग्रुपच्या बजाज ऑटो लिमिटेडने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष घोषणा केली आहे. बजाज ऑटोच्या एखाद्या कायम असणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोना विषाणू ससंर्गामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन वर्षांपर्यंतचा पगार देण्यात येईल. मुलांच्या शिक्षणावर देखील खर्च केला जाईल, असं बजाजनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंकडेनवर सांगितलं आहे. (Bajaj Auto declared company will pay salary to family for 2 years and educate children of employees who die of Corona)

बजाजनं त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटलं?

बजाज ऑटोनं लिंकडेन वर पोस्ट केली आहे. त्यावर त्यांनी कोरोना काळात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पगाराची रक्कम जी दरमहा 2 लाखापर्यंत असेल ती त्याच्या कुटुंबाला दिली जाईल. याशिवाय त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुबीयांच्या नातेवाईकांचा 5 वर्षांचा वैद्यकीय विमा देखील काढण्यात येईल. याशिवाय दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलणार असल्याचं बजाजनं म्हटलं आहे. बजाज ऑटो कर्मचाऱ्याच्या मुलाच्या खर्चासाठी 12 पर्यंतच्या शिक्षणासाठी 1 लाखऱ रुपये दरवर्षी देईल. पदवीचं शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी 5 लाखांचा खर्च बजाज ऑटो करेल, असं सांगण्यात आलं आहे.

संकटकाळात कर्मचाऱ्यांसोबत राहणार

आम्ही कर्मचारी केंद्रीत अशी संस्था असून कोरोना विषाणून संसर्गाच्या काळात आम्ह आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व काळजी घेत आहोत. कोरोनापासून सुरक्षा होण्यासाठीच्या सुविधा, टेस्टिंग आणि रुग्णालय सुविधा, कोरोना लसीकरण शिबीर अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहोत, असं बजाजनं म्हटलं आहे.

बोरोसिल कंपनी देखील 2 वर्ष पगार देणार

बजाज ऑटोपूर्वी बोरोसिल अँड बोरोसिल रिन्यूवेबल्सनं त्यांच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना दोन वर्षापर्यंतचा पगार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय कर्मचाऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील करु असं जाहीर केलं होतं.

मुथूट फायनान्स

मुथूट फायनान्स या कंपनीनं त्यांच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना दोन वर्षापर्यंतचा पगार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. हा लाभ ज्या कर्मचाऱ्यांनी मुथूट फायनान्समध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलं असेल त्यांच्यासाठी देण्यात येईल.

संबंधित बातम्या:

Elon Musk: एलन मस्कचं एक ट्विट, बिटकॉईनच्या किमतीत हजारो डॉलर्सची घसरण, टेस्लाच्या प्रमुखानं काय म्हटलं?

पंजाब नॅशनल बँकेने मुदत ठेवीवरील व्याज दर बदलले, फटाफट वाचा नवे दर

(Bajaj Auto declared company will pay salary to family for 2 years and educate children of employees who die of Corona)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.