Bank Holdiays: आज ‘या’ 15 शहरांमध्ये बँका बंद राहणार, घरातून बाहेर पडण्यापूर्वी यादी तपासा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 30, 2021 | 11:22 AM

आरबीआय दर महिन्याला बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. आरबीआय तिथल्या स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्टीची यादी प्रसिद्ध करते.

Bank Holdiays: आज 'या' 15 शहरांमध्ये बँका बंद राहणार, घरातून बाहेर पडण्यापूर्वी यादी तपासा
Bank holiday list

नवी दिल्ली: जर तुमच्याकडे आज बँकेशी संबंधित (Bank holidays) कोणतेही काम असेल, तर तुम्ही त्याआधी सुट्ट्यांविषयी जाणून घ्या. कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami 2021) मुळे देशातील अनेक शहरांमध्ये आज बंद बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. आरबीआय दर महिन्याला बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. आरबीआय तिथल्या स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्टीची यादी प्रसिद्ध करते.

आरबीआयने ऑगस्ट 2021 च्या बँक सुट्ट्यांची यादी जारी केलीय. या महिन्यात एकूण 15 सुट्ट्या होत्या, पण सध्या या महिन्यात फक्त दोन सुट्ट्याच बाकी आहेत. कोणत्या दिवशी बँका बंद राहतील हे जाणून घेणार आहोत.

जन्माष्टमीमुळे बँकेत कामं होणार नाहीत

30 ऑगस्ट रोजी म्हणजे आज अनेक बँका बंद राहतील. गुजरात, तामिळनाडू, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात बँका बंद राहतील. जन्माष्टमी (श्रावण वड -8) किंवा कृष्ण जयंतीनिमित्त आज भारतातील 15 शहरांमध्ये बँका बंद राहतील.

कोणत्या 15 शहरांमध्ये बँका बंद राहतील?

या शहरांच्या यादीमध्ये अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनौ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगर यांचा समावेश आहे.

31 ऑगस्ट रोजी या शहरात कोणतेही काम होणार नाही

या व्यतिरिक्त जर आपण 31 ऑगस्टबद्दल बोललो तर हा दिवस श्रीकृष्ण अष्टमी (तेलंगणा आणि आंध्र प्रदेश) मध्ये साजरा केला जातो, म्हणून 31 ऑगस्ट रोजी या शहरांत बँका कार्यरत नसतील. आरबीआयच्या सुट्टीच्या यादीनुसार कृष्णा अष्टमीच्या निमित्ताने फक्त तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये बँका बंद राहतील.

सप्टेंबर महिन्यात देशभरात 12 बँक हॉलिडे

सप्टेंबर 12 दिवस बँका बंद राहणार (Bank Holiday in August) आहेत. या महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक सण, उत्सव असल्यामुळे बँका जवळपास 12 दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे. सध्याच्या काळ हा डिजिटल व्यवहारांचा असला तरी काही कामांसाठी आपल्याला बँकांवर अवलंबून राहावे लागतेच. त्यामुळे तुम्हाला बँकेशी संबंधित काही काम किंवा बँकेतून मोठी रक्कम काढायची असेल त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

Gold Price Today: जन्माष्टमीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घट, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Post Office च्या 9 जबरदस्त योजना, कोणत्या योजनेत किती दिवसात पैसे दुप्पट होणार?

Bank Holdiays: Banks will be closed in 15 cities today, check the list before leaving home

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI