AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Holiday : ऑक्टोबरमध्ये तब्बल १६ दिवस बँकांचे कामकाज असेल बंद, RBI ची हॉलिडे लिस्ट जारी

ऑक्टोबर महिन्यात नवरात्र, दसरा आणि इतर सणामुळे अनेक सुट्ट्या आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑक्टोबरचे हॉलिडे कॅलेंडर जारी केले आहे.

Bank Holiday : ऑक्टोबरमध्ये तब्बल १६ दिवस बँकांचे कामकाज असेल बंद, RBI ची हॉलिडे लिस्ट जारी
bank holidays
| Updated on: Sep 29, 2026 | 6:03 PM
Share

ऑक्टोबर २०२६ मध्ये दसरा, छठ पूजा आणि दुर्गा पूजा सारखे मोठे सण आहेत. या महिन्यात २ ऑक्टोबर गांधी जयंतीची सुट्टी आहे. जेव्हा सर्व राज्यातील बँक बंद राहतील. सणाच्या मोसमात अनेक राज्यात ऑक्टोबर महिन्यात अनेक बँक हॉलिडे आहेत. मात्र, ऑनलाईन सेवा उपलब्ध असणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर २०२६ मध्ये काही खास दिवसात बँकेचे कामकाज बंद होणार असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे शनिवारीची सुट्टी संदर्भात देखील एक मोठी अपडेट आहे. तसेच अजूनपर्यंत महिन्याच्या सर्व शनिवारना सुट्ट्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतू ऑक्टोबरच्या महिन्यात ५ पैकी ४ शनिवारी सणांमुळे चारही शनिवार सुट्टी असणार आहे. ज्यात दुसरा आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे.ज्या दिवशी बँका संपूर्ण देशभरात बंद असतील. चला तर पाहूयात आरबीआयने ऑक्टोबर रोजी कोणते बँक हॉलिडे जाहीर केले आहेत.

ऑक्टोबरमध्ये कोण-कोणते सण आहेत ?

ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण महिन्यात महात्मा गांधी जयंती, महालया अमावस्या, महा सप्तमी, दशहरा (महाष्टमी)/महा नवमी/आयुध पूजा/दुर्गा पूजा/विजया दशमी/दुर्गा अष्टमी, दशहरा (विजया दशमी) (आसो सुद-10)/महानवमी, आयुध पूजा/दुर्गा पूजा, विजया दशमी/दुर्गा पूजा (दसाईं), दुर्गा पूजा (दसाईं), लक्ष्मी पूजा/एक्सेशन डे/महर्षी वाल्मीकी जन्मदिन, करवा चौथ, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन सारखे सण आणि दिन साजरे होणार आहे. या दिवशी बँका बंद असणार आहेत.

भारतात सर्व शेड्युल्ड आणि नॉन-शेड्युल्ड बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सार्वजनिक सुट्टी असते. आरबीआय जोपर्यंत काही सांगितले नसेल तोपर्यंत पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या ( काही प्रकरणात ) शनिवारी बँकांचे कामकाज सुरु असते. पहिला शनिवार सोडला तर तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सणामुळे बँका बंद राहणार आहेत.

ही पाहा बँकांची सुट्ट्याची यादी

2 ऑक्टोबर 2026: महात्मा गांधी जयंतीमुळे 2 ऑक्टोबर 2026 रोजी बँक बंद राहतील. भारतातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील बँक बंद राहतील कारण या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर झालेले असते.

4 ऑक्टोबर 2026: रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद असतील.

10 ऑक्टोबर 2026: 10 ऑक्टोबर, 2026 रोजी कर्नाटक आणि कोलकातात महालया अमावस्येमुळे बँक बंद असतील. तसेच महिन्याचा दूसरा शनिवार असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद राहतील.

11 ऑक्टोबर 2026: रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद असतील

17 ऑक्टोबर 2026: त्रिपुरात महा सप्तमी उत्सवामुळे 17 ऑक्टोबर , 2026 रोजी बँका बंद आहेत.

18 ऑक्टोबर 2026: रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद असतील

19 ऑक्टोबर 2026: 19 ऑक्टोबर, 2026 रोजी त्रिपुरा, मिझोरम, ओडिशा, तामिलनाडु, आसम, मणिपुर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि मेघालयात दशहरा (महाष्टमी)/महा नवमी/अयुथा पूजा/दुर्गा पूजा/विजय दशमी/दुर्गा अष्टमीचा सण साजरा करण्यासाठी बँका बंद करतील.

20 ऑक्टोबर 2026: 20 ऑक्टोबर 2026 दशहरा/दशहरा (विजयादशमी) (आसो सूद-10)/महानवमी, आयुधपूजा/दुर्गा पूजा साजरा करण्यासाठी त्रिपुरा, गुजरात, मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, चंडीगढ़, तमिलनाडु, उत्तराखंड, असम, तेलंगाना, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू आणि कश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ, नागालँड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गोवा, बिहार, छत्तीसगडमध्ये बँक बंद आहेत. झारखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, केरल आणि आंध्र प्रदेश. 20 ऑक्टोबर 2026 रोजी मणिपुर आणि सिक्किमला वगळून सर्व राज्यात बँक बंद आहेत.

21 ऑक्टोबर 2026: 21 ऑक्टोबर, 2026 रोजी विजयादशमी/दुर्गा पूजा (दसैन) साजरा करण्यासाठी त्रिपुरा, कर्नाटक, सिक्किम, असम, केरल आणि पश्चिम बंगालमध्ये बँक बंद आहेत.

22 ऑक्टोबर 2026: सिक्किममध्ये दुर्गा पूजा (दसाईं) साजरा करण्यासाठी 22 ऑक्टोबर 2026 रोजी बँका बंद रहातील.

23 ऑक्टोबर 2026: सिक्किममध्ये दुर्गा पूजा (दसाईं) साजरा करण्यासाठी 23 ऑक्टोबर, 2026 रोजी बँका बंद राहातील.

24 ऑक्टोबर 2026: महीन्याचा चौथ्या शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असतील.

25 ऑक्टोबर 2026: रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद असतील

26 ऑक्टोबर 2026: त्रिपुरा, चंडीगढ़, जम्मू आणि श्रीनगर आणि हिमाचल प्रदेशात लक्ष्मी पूजा/एक्सेशन डे/महर्षी वाल्मीकी जयंती साजरी करण्यासाठी 26 ऑक्टोबर, 2026 रोजी बँका बंद राहातील.

29 ऑक्टोबर 2026: हिमाचल प्रदेशमध्ये करवा चौथ साजरा करण्यासाठी 29 ऑक्टोबर 2026 रोजी बँका बंद राहतील.

31 ऑक्टोबर 2026: गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीमुळे 31 ऑक्टोबर, 2026 रोजी बँका बंद असतील.

बँकेच्या सुट्ट्यांच्या दिवशीही डिजिटल बँकिंग –

ग्राहक बँकेच्या सुट्ट्यांच्या दिवशीही, ऑनलाइन बँकिंग, स्मार्टफोन ॲप्स आणि UPI-आधारित पेमेंटचा वापर करून घरबसल्या त्यांची बहुतेक बँकिंग कामे करू शकतात. सुट्ट्यांच्या दिवशीही पैसे हस्तांतरण, बिल भरणे आणि खाते व्यवस्थापन नेहमीसारखे करता येईल.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय