Bank of Baroda च्या ‘या’ योजनेत पैसे डबल होतील, 1000 रुपयांपासून करा सुरुवात

ही योजना देशातील टपाल कार्यालयं आणि बँकांमध्ये चालवली जाते. हे एक लहान बचतीचं साधन आहे जे तुम्हाला बर्‍याच काळासाठी बचत योजनेत गुंतवणूक करण्यास सांगतं.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:12 AM, 4 Mar 2021
Bank of Baroda च्या 'या' योजनेत पैसे डबल होतील, 1000 रुपयांपासून करा सुरुवात
canara bank fixed deposit

मुंबई : तुम्ही पैसे गुंतवणुकीसाठी जर काही योजना शोधत असाल तर सुरक्षित पैसे आणि लाभ देणारी एक महत्त्वाची योजना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बँक ऑफ बडोदाच्या ‘किसान विकास पत्र’ योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. ही योजना देशातील टपाल कार्यालयं आणि बँकांमध्ये चालवली जाते. हे एक लहान बचतीचं साधन आहे जे तुम्हाला बर्‍याच काळासाठी बचत योजनेत गुंतवणूक करण्यास सांगतं. (bank of baroda kisan vikas patra eligibility features interest rates returns kvp)

जाणून घ्या काय आहे किसान विकास पत्र…

हे एक लोकप्रिय गुंतवणुकीचं साधन आहे ज्यामध्ये कमी जोखीम आणि उत्पन्नाची हमी दिली जाते. किसान विकास पत्रावर 6.9 टक्के दराने व्याज मिळतं. जे 1 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 पर्यंत चालू आहे. भारत सरकार दर तीन महिन्यांनी ई-केव्हीपीच्या व्याज दरात बदल करते.

किसान विकास पत्र अल्प बचत योजना आहे. या योजनेला भारतीय पोस्टने 1988 मध्ये लाँच केले होते. दीर्घ काळासाठी लोकांनी यात गुंतवणूक करावी असा या योजनेचा उद्देश होता. या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये गुंतवावे लागतात. या योजनेसाठी अधिकाधिक मर्यादा नाही. सरकारने 2014 मध्ये या योजनेअंतर्गत पॅनकार्ड अनिवार्य केले होते. मात्र 50 हजार रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्यास पॅनकार्ड अनिवार्य आहे. जर 10 लाखांहून अधिक गुंतवणूक केली तर उत्पन्नाचा पुरावा, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट किंवा इनकम टॅक्स रिटर्न सोबत जोडावे लागते.

– किसान विकास पत्र ही दीर्घ मुदतीची आणि एक वेळ गुंतवणूक योजना आहे. यामध्ये निश्चित वेळेत पैसे दुप्पट होतात. किसान विकास पत्र देशातील सर्व टपाल कार्यालये आणि मोठ्या बँकांमध्ये उपस्थित आहे.

– यात 124 महिन्यांच्या एकाकी गुंतवणुकीनंतर गुंतवणूकदाराला दुप्पट परतावा दिला जातो. यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे.

– कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नाही. ही एक अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहे, कारण पोस्ट ऑफिस योजनांवर सरकारची हमी आहे.

– किसान विकास पत्र (KVP) प्रमाणपत्र स्वरूपात गुंतवणूक करतो. इथे 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतची प्रमाणपत्रे आहेत, जी खरेदी करता येतील.

काय आहे वयोमर्यादा?

18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करु शकते. ग्रामीण भागात बँकेची सुविधा कमी असल्याने तेथे या योजनेचे आकर्षण अधिक आहे. या योजनेची खासियत म्हणजे मार्केटमध्ये कितीही उलाढाल झाली तरी या योजनेत रिटर्नची खात्री आहे. या योजनेत प्रत्येक तीन महिन्यांसाठी व्याजदर लागू होतो. जानेवारी-मार्च तिमाहीसाठी व्याजदर 6.9 टक्के असले तरी व्याजदर वर्षिक मोजले जाते. मात्र यात फायदा चांगला आहे.

टॅक्सचे नियम काय आहेत?

या योजनेत गुंतवणूक केल्यास 80 सी अंतर्गत टॅक्सचा लाभ मिळत नाही. तसेच रिटर्नही करपात्र आहे. मॅच्युरिटीनंतर रिटर्नवर टीडीएस कापला जात नाही. किसान पत्रच्या आधारे कर्जही घेता येते. या कर्जावर व्याजदर कमी असते.

किसान विकास पत्राचे प्रकार

किसान विकास पत्र मुख्यत्वे तीन प्रकारचे असतात. सिंगल होल्डर टाईप सर्टिफिकेटमध्ये अॅडल्ट इंडिव्हिज्युअल किंवा अल्पवयीन ऐवजी सज्ञान व्यक्तीला जारी केले जाते. दोन व्यक्ती जॉईंट गुंतवणूक या योजनेत करु शकतात. यामध्ये मॅच्युरिटी रक्कम दोघांनाही मिळते किंवा जो हयात असेल त्याला 100 टक्के रक्कम मिळते. जॉईंट सर्टिफिकेटमध्ये आणखी एक Joint ‘B’ Type Certificate असते. (bank of baroda kisan vikas patra eligibility features interest rates returns kvp)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महागलं, वाचा आजचे ताजे दर

BoB च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता कुठलंही काम असेल तर ‘हा’ नंबर करा सेव्ह

1 एप्रिलपासून मोठा बदल होणार; ‘या’ बँकेत खाते असल्यास लक्ष द्या, अन्यथा…

Breaking : Post Office मध्ये अकाऊंट असेल तर 1 एप्रिलपासून नियम बदलणार, आता या कामासाठी द्यावे लागणार पैसे

(bank of baroda kisan vikas patra eligibility features interest rates returns kvp)