होम लोन स्वस्त झाल्याने रोजगार वाढले, बँकांमध्ये नोकरीची संधी, पगारही वाढला

Home Loan | अलीकडच्या काही महिन्यांत गृहकर्जाच्या नोकऱ्यांमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचे उद्योग तज्ञ आणि गृहकर्ज तज्ञांचे म्हणणे आहे. याचे कारण म्हणजे बँका किंवा फायनान्स कंपन्यांना त्यांचे गृहकर्ज लहान शहरांमध्ये वाढवायचे आहे आणि कमी गृहकर्ज दरांद्वारे अधिकाधिक ग्राहक आकर्षित करायचे आहेत.

होम लोन स्वस्त झाल्याने रोजगार वाढले, बँकांमध्ये नोकरीची संधी, पगारही वाढला
होम लोन

नवी दिल्ली: कोरोनाकाळानंतर बँका, गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण गृहकर्ज पूर्वीपेक्षा खूपच स्वस्त झाले आहे. स्वस्त गृहकर्जामुळे लोकांची मागणी वाढली आहे. त्यानुसार बँका आणि गृहनिर्माण संस्था इत्यादींमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, जे ग्राहकांना यासंबंधी सेवा देऊ शकतात. ही परिस्थिती पाहता या क्षेत्रात नोकरभरतीत 22 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यांना गृहकर्ज किंवा बँकिंग कामाचा अनुभव आहे त्यांना बँका, वित्त कंपन्या आणि बिगर बँकिंग संस्थांमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात.

अलीकडच्या काही महिन्यांत गृहकर्जाच्या नोकऱ्यांमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचे उद्योग तज्ञ आणि गृहकर्ज तज्ञांचे म्हणणे आहे. याचे कारण म्हणजे बँका किंवा फायनान्स कंपन्यांना त्यांचे गृहकर्ज लहान शहरांमध्ये वाढवायचे आहे आणि कमी गृहकर्ज दरांद्वारे अधिकाधिक ग्राहक आकर्षित करायचे आहेत.

बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची गरज

बँका, एनबीएफसी आणि एचएफसीमध्ये रोजगाराचे प्रमाण 22 ते 25 टक्क्यांनी वाढले आहे. ही वाढ गेल्या 3-4 महिन्यांत अधिक दिसून आली विशेषत: कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर. पुढील काही वर्षे ही वाढ कायम राहू शकते असे त्याचे संकेत आहेत. गृहकर्ज सेवा देण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज वाढली आहे.

या नोकऱ्यांमध्ये, 90 टक्के मागणी विक्री क्षेत्रातील आहे. म्हणजेच गृहकर्ज विकणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी जास्त आहे. हेच कर्मचारी ग्राहकांना गृहकर्ज घेण्यास प्रवृत्त करतात. पगाराव्यतिरिक्त त्यांना प्रत्येक कर्जामागे कमिशनही दिले जाते. ज्यांना या क्षेत्रात नोकरी मिळेल, त्यांना 15,000 ते 20,000 रुपये पगार मिळू शकतो. याशिवाय अनेक आकर्षक सवलतीही दिल्या जाणार आहेत.

गृहकर्जाची मागणी वाढली

कोरोनाकाळात बहुतेक लोकांनी घरून काम केले आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या स्वतःच्या घराच्या गरजा वाढल्या असून त्यांना पूर्वीपेक्षा मोठे घर हवे आहे. त्यामुळे गृहकर्जाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्या आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या गृहकर्ज विभागाकडे अधिक लक्ष देत आहेत कारण त्यात कर्ज चुकवण्यास कमी वाव आहे. लोक गृहकर्जाचे पैसे परत करतात कारण त्यांच्या हातून घर हिसकावले जाण्याची भीती असते. बँका अत्यंत कमी दरात गृहकर्ज देत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. युनियन बँक देत असलेल्या गृहकर्जाचा दरही 6.4 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

शहरी आणि ग्रामीण भागात बँकांना कर्मचाऱ्यांची गरज

बँका, एनबीएफसी आणि एचएफसी यांना ग्रामीण भागात तसेच शहरांमध्ये त्यांचा विस्तार वाढवायचा आहे, ज्यासाठी त्यांना अधिक कर्मचार्‍यांची आवश्यकता असेल. अशा अनेक कंपन्या किंवा बँका आहेत जिथे लोकांनी नोकऱ्या सोडल्या आहेत, ज्यामुळे रिक्त पदे निर्माण झाली आहेत. पण सध्या जवळपास सर्वच बँकांमध्ये नोकरभरती सुरू आहे. भविष्यात गृहकर्ज आणि पत यांची मागणी झपाट्याने वाढेल, असे बँकांना वाटते.

श्रीराम हाऊसिंग फायनान्सने सप्टेंबरमध्ये घोषणा केली की, ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 350 कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. आयसीआयसीआय होम फायनान्सने सप्टेंबरमध्ये घोषणा केली की ते या कॅलेंडर वर्षाच्या अखेरीस गृहकर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी 600 हून अधिक कर्मचारी भरती करतील.

संबंधित बातम्या:

सौरउर्जेच्या क्षेत्रात भारताची मोठी झेप; अवघ्या सात वर्षांमध्ये क्षमतेत 17 पट विस्तार

पीएफ खातेधारकांची पेन्शन वाढण्याची शक्यता, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

विम्याच्या जगात जागतिक स्तरावर जाण्याच्या तयारीत ओला; यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून सुरू करणार विस्तार


Published On - 7:53 am, Mon, 8 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI