AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील आठवड्यात चार दिवस बँका बंद असणार; नेमक्या कोणत्या दिवशी सुट्टी असणार? पाहा तारीख

आता पुढील आठवडा सुरु होईल. या आठवड्यात जर बँकिग संदर्भातील काही कामे असतील तर आधी सुट्ट्यांची यादी पाहून घ्या कारण पुढील आठवड्यात चार सुट्ट्या असणार आहेत.

पुढील आठवड्यात चार दिवस बँका बंद असणार; नेमक्या कोणत्या दिवशी सुट्टी असणार? पाहा तारीख
bank holiday
| Updated on: Jun 21, 2026 | 10:59 AM
Share

उद्यापासून नवीन आठवडा सुरू होत आहे. तर येत्या आठवड्यात, 22 जून ते 28 जून 2026 दरम्यान, भारतातील खाजगी आणि सार्वजनिक बँका चार दिवस बंद राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीय, प्रादेशिक आणि धार्मिक सुट्ट्यांच्या आधारावर या महिन्यातील अकरा सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि सर्व रविवार यांचा समावेश आहे. या सुट्ट्या देशभरात लागू होणार नाहीत; काही सुट्ट्या विशिष्ट राज्ये आणि शहरांपुरत्या मर्यादित आहेत. यामुळे बँकेत जाण्यापूर्वी एकदा या सुट्ट्यांवर नजर घाला. जर तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर ती ज्या दिवशी सुट्ट्या नसतील तेव्हा उरकून घ्या अन्यथा काम वेळेवर होणार नाहीत.

पुढील आठवड्यातील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

  • 22 जून (सोमवार) – रथयात्रेच्या निमित्ताने ओडिशा, पश्चिम बंगाल आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
  • 25 जून (गुरुवार) – मोहरमच्या विशेष निमित्ताने केवळ विजयवाडा, आंध्र प्रदेश येथे बँका बंद राहतील.
  • 26 जून (शुक्रवार) – मोहरम/आशुराच्या निमित्ताने देशभरातील बहुतेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळूर, पाटणा, जयपूर, भोपाळ आणि इतर अनेक प्रमुख शहरांचा समावेश आहे.
  • 27 जून (शनिवार) – हा महिन्याचा चौथा शनिवार आहे, त्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँका या दिवशी बंद असतात.
  • 28 जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टीमुळे या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.

सलग तीन दिवस बंद जर तुम्ही उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा बिहारचे रहिवासी असाल, तर 26 जून (शुक्रवार) ते 28 जून (रविवार) पर्यंत बँका सलग तीन दिवस बंद राहतील. त्यामुळे, चेक क्लिअरन्स, ड्राफ्ट प्रोसेसिंग किंवा रोख रक्कम जमा करण्याची कामे गुरुवार, 25 जून रोजी पूर्ण करा.

डिजिटल बँकिंगवर अवलंबून रहा

सुट्ट्यांमुळे बँकेच्या शाखा बंद असू शकतात, परंतु काळजी करण्याची गरज नाही कारण नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय (गुगल पे, फोनपे) आणि एटीएम यांसारख्या सर्व ऑनलाइन डिजिटल सेवा 24 तास सुरू राहतील.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला