पाकिस्तानला मोठा झटका, शेल आणि फायझर कंपनीनंतर आता या कंपनीने गाशा गुंडाळला
प्रॉक्टर एण्ड गॅम्बल कंपनीने पाकिस्तानातील आपला कारभार बंद करण्याची घोषणा केली आहे. टाईट, पॅम्पर्स सारखे ब्रँड निर्माण करणाऱ्या या कंपनीने आता थर्ड पार्टी डिस्ट्रीब्युशन मॉडेलचा पाकिस्तानात वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील कर्मचाऱ्यांना आता परदेशात नियुक्तीचे पॅकेज दिले जाणार आहे.

पाकिस्तानला एकामागोमाग मोठे झटके बसत आहेत. आधी पाकिस्तान कर्जात बुडाला आहे. आधी शेल आणि फायजर या कंपन्यांनी पाकिस्तानातून आपला गाशा गुंडाळला आहे. आणखी एक दिग्गज कंपनी प्रॉक्टर एण्ड गॅम्बलने जागतिक पुनर्गठन कार्यक्रमाची घोषणा केल्याच्या काही महिन्यानंतर पाकिस्तानातील आपला कारभार बंद करण्याची घोषणा केली आहे. P&G ही कंपनी टाईड डिटर्जेंट आणि घरगुती सामान तयार करते.पाकिस्तानातील तिची रेझर डिव्हीजन जिलेट पाकिस्तान लिमिटेडमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि बिझनेस ऑपरेशन बंद करण्याचा निर्णय या कंपनीने घेतला आहे. परंतू कंपनी या भागात तिच्या दुसऱ्या एका ऑपरेशन्स अंतर्गत कंज्युमर्स प्रोडक्ट्स पुरवत रहाणार आहे.
P&G ने सांगितले की ती तिच्या ब्रँडची संख्या कमी करणार आणि पुढच्या दोन वर्षात 7,000 जॉब्स कट करणार आहे. कंपनीने ट्रेड टॅरिफ्स आणि कमजोर मागणीमुळे तिच्या गाईडन्सला देखील कमी केले आहे. या निर्णयामुळे P&G त्या मल्टी नॅशनल कंपन्यात सामील झाली आहे ज्यांनी पाकिस्तानचा बिझनस कमी केला आहे. नफ्यावर बंदी आणि कमी मागणी सारख्या व्यापारी आणि आर्थिक आव्हानामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. दोन वर्षांपूर्वी जिलेट पाकिस्तानचा महसूल ३ अब्ज रुपयांपर्यंत पोहचला होता. परंतू जून २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात जो जवळपास अर्धाच राहिला आहे.
केव्हापासून सुरु होती कंपनी ?
P&G ने 1991 मध्ये पाकिस्तानात आपला व्यवसाय सरु केला होता. त्यात पॅम्पर्स, सेफगार्ड, एरिएल, हेड एण्ड शोल्डर्स आणि पॅन्टीन शाम्पू सारखे ब्रँड सह देशातील टॉप कंझ्युमर कंपनी बनली होती. या कंपनीने 1994 मध्ये एक साबण प्लांट आणि 2010 मध्ये एक डिटर्जेंट प्लांट खरेदी करुन आपला व्यवसाय वाढवला होता. कंपनीने म्हटले होते की पाकिस्तानात कंज्युमर्सना सेवा देण्यासाठी थर्ड-पार्टी डिस्ट्रीब्युशन मॉडेलच सर्वात योग्य मार्ग आहे. कर्मचाऱ्यांना परदेशात जॉब्स वा सेपरेशन पॅकेज ऑफर केले जाणार आहेत.
सर्वकाही ठीक नाहीए
जिलेट पाकिस्तानचे बोर्ड डिलिस्टींग सारख्या पावलांचा विचार करण्यासाठी एक मिटींग घेणार आहे. कंपनीचे शेअर्स 10% च्या डेली लिमिटपर्यंत वाढून तीन आठवड्यातील सर्वाच्च पातळीवर पोहचले आहेत. जिलेट पाकिस्तानचे माजी सीईओ साद अमानुल्लाह खान यांनी वीजेचे उच्च दर, खराब पायाभूत सुविधा आणि रेग्युलटरी दबावाचा उल्लेख करत सांगितले की मला आशा आहे की अशा प्रकारच्या एक्झिटने सरकाराला समजले की सर्वकाही ठीक नाहीए. ही परिस्थिती सुधारावी म्हणजे कंपन्या माघारी जाणार नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.
