…भर लो झोली, बिल गेट्स करणार अख्खी संपत्ती दान; ‘या’ संस्थेला संपूर्ण रक्कम

जागतिक श्रीमंतांच्या (World richest person) यादीत वर्णी लागावी यासाठी स्पर्धा सुरू असताना बिल गेट्स संपत्ती दान करुन क्रमवारीतून एक्झिट घेत आहेत.

...भर लो झोली, बिल गेट्स करणार अख्खी संपत्ती दान; ‘या’ संस्थेला संपूर्ण रक्कम
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 11:16 PM

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांच्या दातृत्वाच्या कहाण्या नेहमीच चर्चिल्या जातात. जगभरातील समाजसेवी संस्थांसाठी बिल गेट्स आपली झोळी रीती करत असतात. जगातील सर्वात श्रीमतांच्या क्रमवारीत गेट यांचा चौथा क्रमांक लागतो. आजमितिला 113 अरब डॉलरची (अंदाजित 9.10 लाख कोटी) संपत्ती गेट्स यांच्या गंगाजळीत आहे. गेल्या एक वर्षात गेट्स यांच्या संपत्तीत 644 मिलियन डॉलरची भर पडली आहे. दरम्यान, बिल गेट्स आपली संपूर्ण संपत्ती दान करण्याच्या विचारात आहेत. जागतिक श्रीमंतांच्या (World richest person) यादीत वर्णी लागावी यासाठी स्पर्धा सुरू असताना बिल गेट्स संपत्ती दान करुन क्रमवारीतून एक्झिट घेत आहेत.

मिशन दातृत्व

बिल गेट्स यांनी नुकतंच ट्विटच्या मालिकेतून दातृत्वाची योजना सार्वजनिक केली आहे. आपली संपूर्ण संपत्ती फाउंडेशनला दान करण्याचा विचार सुरू आहे. ज्यामुळे श्रीमंताच्या जागतिक क्रमवारीतून माझ्या नावाची घसरण होईल असे बिल यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे. चालू महिन्यात गेट्स 20 अरब डॉलर रक्कम बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनला दान करणार आहेत. बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशन 6 अरब डॉलर वरुन 9 अरब डॉलर प्रतिवर्ष संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष 2026 पर्यंत वार्षिक 900 कोटी डॉलर (अंदाजित 71,910 कोटी) खर्च करणार आहे.

महत्वाची वैशिष्ट्ये

· जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती

हे सुद्धा वाचा

· ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार 113 अरब डॉलरची एकूण संपत्ती

· संपूर्ण संपत्ती बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनला दान करणार

· चालू महिन्यात 20 अरब डॉलर संपत्ती फाउंडेशनला

दानात आनंद

समाजोपयगी कामासाठी पैसे दान करण्याचा निर्णयाचा मला आनंदच आहे. आपली संपत्ती पुन्हा समाजपयोगी कामासाठी परत करणं ही माझी नैतिक जबाबदारी ठरते. ज्यामुळे लोकांच्या आयुष्यात महत्वपूर्ण बदल होतील. जगासमोर सध्या मोठी संकटे आहेत. कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध तसेच हवामान बदलामुळं जनजीवन प्रभावित झालं आहे. त्यामुळे जगातील अन्य श्रीमंतानी संपत्ती दान देण्याबाबत निश्चितच विचार करावा असं आवाहन गेट्स यांनी केलं आहे. (Bill gates planning to donate his entire wealth to the bill and Melinda gates foundation know details in marathi)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.