AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी तीन वर्षे पगारच घेतला नाही, कंपनीने मात्र सरकारची तिजोरी भरली

मुकेश अंबानी देशातील सर्वात बड्या कंपनीचे टॉप एक्झुकेटीव्ह आहेत. तसेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते दशकभरापासून रिलायन्स इंडस्ट्रीजचा कारभार पाहात आहेत.

रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी तीन वर्षे पगारच घेतला नाही, कंपनीने मात्र सरकारची तिजोरी भरली
Mukesh Ambani
| Updated on: Aug 07, 2023 | 8:44 PM
Share

नवी दिल्ली | 7 ऑगस्ट 2023 : देशातील सर्वात मोठी लिस्टेड कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा भारतातीलच नव्हे तर आशियातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी सलग तिसऱ्यावर्षी विनावेतन काम करीत आहेत. दुसरीकडे त्यांच्या कंपनीने मात्र सरकारच्या तिजोरीत तगडा कर जमा केला आहे. तसेच नोकऱ्या निर्माण करण्यातही रिलायन्स कंपनी उजवी ठरली आहे.

आर्थिक वर्षे 2023-24 च्या पहिल्या तिमाहीचे कंपन्यांचे रिझल्ट जारी होत आहेत. देशातील मोठी कंपनी रिलायन्सने दोन आठवड्यापूर्वीच आपले रिझल्ट जारी केले आहेत. या महिना अखेर कंपनीच्या भागधारकांची वार्षिक बैठक पार पाडणार आहे. प्रस्तावित एजीएम पूर्वीच रिलायन्सने आपली 2022-23 ची वार्षिक कामगिरी सादर केली आहे. त्या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी सह अनेक टॉप एक्झुकेटीव्ह यांच्या सॅलरीबद्दल माहीती दिली आहे. तसेच कंपनीने सरकारदरबारी दिलेल्या कर स्वरुपातील रकमेची तसेच निर्माण केलेल्या रोजगाराबद्दलची माहीती दिली आहे.

तीन वर्षांत सरकारी तिजोरीत भर  

वार्षिक अहवालानूसार रिलायन्स इंडस्ट्रीज यंदा सर्वाधिक कर भरणारी कंपनी ठरली आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत रिलायन्सने सरकारी तिजोरीत 1.77 लाख कोटी रुपयाचं योगदान दिले आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या कंपनीने 1.88 लाख कोटी रुपये जमा केले होते. कंपनीने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, स्पेक्ट्रम शुल्क आदी मिळून गेल्या तीन वर्षांत सरकारी खजिन्यात 5.65 लाख कोटी रुपये जमा केले आहे.

 अजून पाच वर्षे काम करणार अंबानी 

रिलायन्स इंडस्ट्रीजची 46 वी एजीएम येत्या 28 ऑगस्ट रोजी होत आहे. यापूर्वी 21 जुलै रोजी कंपनीने जून तिमाहीच्या आर्थिक अहवालाची घोषणा करण्यात आली होती. आता कंपनीने एजीएम आधीच आपली ताजी वार्षिक कामगिरी सादर केली आहे. कंपनीने मुकेश अंबानी यांना आगामी पाच वर्षे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम ठेवण्याच्या प्रस्तावावर भागधारकांची मंजूरी मागितली आहे.

तिसऱ्या वर्षीही मुकेश अंबानींचा पगार शून्य 

मुकेश अंबानी देशातील सर्वात बड्या कंपनीचे टॉप एक्झुकेटीव्ह आहेत. तसेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते दशकभरापासून रिलायन्स इंडस्ट्रीजचा कारभार पाहात आहेत. एजीएममध्ये शेअरधारकांच्या मंजूरीनंतर ते कंपनीचे 2029 पर्यंत सीएमडी राहतील. विशेष म्हणजे ते या काळात कोणतेही वेतन घेणार नाहीत. कोविड काळानंतर मुकेश अंबानी यांनी सीएमडी पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतरही कोणताही पगार स्वीकारला नाही. गेल्यावर्षी देखील त्यांनी पगार घेतला नाही. गेली तीन वर्षे ते विनापगार काम करीत आहेत.

सहकाऱ्यांच्या मात्र पगारात वाढ

एकीकडे अंबानी कोणताही पगार किंवा भत्ता, रिटायरमेंट बेनिफिट, कमीशन अथवा स्टॉक ऑप्शनचा लाभ घेत नसताना रिलायन्सचे उर्वरित टॉप एक्झुकेटिव्ह चा पगार मात्र वाढतच आहे. अंबानी यांचे निकटवर्तीय निखिल मेसवानी यांचा पगार गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत एक कोटींनी वाढला आहे. आर्थिक वर्षे 2022-23 मध्ये त्यांना 25 कोटी वार्षिक वेतन मिळाले आहे. हितल मेसवानी यांचेही वेतन 25 कोटीझाले आहे. तर तेल आणि गॅस बिझनेसचे पी.एम. प्रसाद यांचे वेतन वाढून 13.5 कोटी झाले आहे. यापूर्वी त्यांना वार्षिक 11.89 कोटी रुपये पगार होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.