AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

35 पैशांच्या स्टॉकने शेअर बाजार गदागदा हलवला; 14 महिन्यात गुंतवणूकदार करोडपती

Penny Stock Huge Profit : शेअर बाजारात काही नामचिन शेअर असतात. ते लवकर गवसत नाहीत. ज्यावेळी त्याची चर्चा होते, त्यावेळी मग आपल्याला आठवते की या कंपनीचा डेटा आपण पाहिला होता. पण वेळीच लक्ष दिले नाही. Elcid Investment या कंपनीनंतर या स्टॉकने असाच बॉम्ब टाकला आहे...

35 पैशांच्या स्टॉकने शेअर बाजार गदागदा हलवला; 14 महिन्यात गुंतवणूकदार करोडपती
या कंपनीला 916 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर, कार्यादेश मिळाल्याने हा बदल झाला आहे. एनबीसीसी कंपनीच्या शेअरमध्ये एका वर्षात 120 टक्क्यांची उसळी आली आहे.
| Updated on: Nov 10, 2024 | 4:18 PM
Share

भारतीय शेअर बाजारात काही स्टॉक असे आहेत, ज्यांनी अगदी कमी वेळेत गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून दिला. Elcid Investment या शेअरची आरती अजून संपलीच नाही तर या स्टॉकचं कौतुक कानावर येऊन धडकलं आहे. गेल्या 14 महिन्यात या स्टॉकने जमिनीवरून आकाशात भरारी घेतली आहे. 35 पैशांचा हा स्टॉक सध्या 24.41 रुपयांवर पोहचला आहे. त्याच्या या गगन भरारीने गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले झाली आहे.

महिनाभरापासून अप्पर सर्किट

बिट्स लिमिटेड (Bits Ltd) या कंपनीने हा पराक्रम केला आहे. या शेअरने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार रिटर्न दिला आहे. केवळ 35 पैशांचा हा स्टॉक अवघ्या काही महिन्यात 24.41 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना 6874 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या शेअरमध्ये सातत्याने 2% अप्पर सर्किट लागला आहे. हा शेअर अजूनही तेजीवर स्वार आहे.

असे केले करोडपती

14 महिन्यांपूर्वी बिट्स लिमिटेडचा शेअर अवघ्या 35 पैशांना मिळत होता. आता त्याची किंमत 24.41 रुपयेवर पोहचला. ज्यांनी या शेअरमध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली. ती गुंतवणूक आता जवळपास 70 लाख रुपये झाली आहे. हा आकडा गुंतवणूकदारांना हैराण करणारा आहे. या कंपनीने 14 महिन्यात मोठा नफा मिळवला. जर एखाद्याने या कंपनीत दीड लाख रूपयांची गुंतवणूक केली असेल तर ही रक्कम 1 कोटी रुपयांहून अधिक झाली असती. या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे.

गुंतवणूकदारांना मिळाला 8 पट रिटर्न

गेल्या सहा महिन्यात बिट्स लिमिटेडच्या शेअरने 727 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. मे 2023 मध्ये या स्टॉकची किंमत 2.95 रुपये इतकी होती. आता हा स्टॉक 24.41 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजे सहा महिन्यातच गुंतवणूकदारांना एक लाखांच्या गुंतवणुकीवर जवळपास 8 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

आता झाला दुप्पट

सप्टेंबर 2023 मध्ये बिट्स लिमिटेडचा शेअर 12.32 रुपयांवर होता. तो आता वाढून 24.41 रुपयांवर पोहचला आहे. अवघ्या दोन महिन्यात गुंतवणुकदारांची रक्कम दुप्पट झाली आहे. बाजारात चढउताराचे सत्र सुरू असताना काही स्टॉक, छोटा पॅकेट बडा धमाका ठरले आहेत. हे स्टॉक धमाकेदार ठरत आहेत. त्यात बिट्स लिमिटेडने मोठी आघाडी घेतली आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा