AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 दिवसात पैशांचा पाऊस पाडला; 3 रुपयांचा शेअर पोहचला 3,00,000 वर, गुंतवणूकदारांचे पाय नाहीत जमिनीवर

Penny Stock Huge Return : Elcid Investment या कंपनीने अजून एक भीम पराक्रम केला आहे. अवघ्या 7 दिवसात कंपनीचा शेअर 3.53 रुपयांहून वाढून 3 लाख रुपयांवर पोहचला आहे. हा देशातील सर्वात महागडा स्टॉक ठरला आहे. 5 दिवसातच कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांची उसळी दिसून आली.

7 दिवसात पैशांचा पाऊस पाडला; 3 रुपयांचा शेअर पोहचला 3,00,000 वर, गुंतवणूकदारांचे पाय नाहीत जमिनीवर
मल्टिबॅगर स्टॉक
| Updated on: Nov 07, 2024 | 4:20 PM
Share

एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअरची बाजारात जोरदार चर्चा आहे. कंपनीच्या शेअरने गेल्या 7 दिवसात गुंतवणूकदारांचे नशीब पार पालटून टाकले आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सचा शेअर गुरुवारी BSE वर 5 टक्क्यांसह उसळला. हा शेअर आता 3,16,597.45 रुपयांवर पोहचला आहे. कंपनीचा शेअर केवळ 7 दिवसांत 3.53 रुपयांहून 3 लाख रुपयांच्या पुढे गेला. गेल्या 5 दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. या कालावधीत कंपनीच्या शेअरने 43,000 रुपयांहून अधिकची उसळी घेतली आहे.

एकाच दिवसात 3.53 रुपयांहून 2.36 लाख रुपयांवर शेअर

एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर गेल्या आठवड्यात अधिक चर्चेत आला होता. कंपनीचा शेअर 29 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात 3.53 रुपयांहून वधारून 2,36,250 रुपयांवर पोहचला. या नवीन अपडेटमुळे एल्सिड इन्वहेस्टमेंटचा शेअर भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक ठरला आहे. BSE आणि NSE वर आयोजित एका स्पेशल कॉल ऑक्शनमुळे ही तेजी आल्याचे दिसून आले.

5 दिवसात 43,000 रुपयांनी वधारला शेअर

या कंपनीचा शेअरने गेल्या पाच दिवसांत जोरदार उसळी घेतली. कंपनीच्या शेअर गेल्या पाच दिवसांत 15 टक्क्यांहून अधिकने उसळला. एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर या कालावधीत 43,108 रुपयांनी वधारला. कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील सर्वकालीन उच्चांकावर 3,16,597 रुपयांवर आहे. तर याच वर्षात कंपनीचा 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 3.37 रुपये इतकी आहे.

आर्थिक वर्ष 2024 मध्ये या कंपनीने डिव्हिडंड देण्यातही रेकॉर्ड केला आहे. या आर्थिक वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना 25 रुपयांचा लाभांश दिला. हा इंडस्ट्रीतील सर्वात जोरदार डिव्हिडंडपैकी एक ठरला आहे. गेल्या आर्थिक वर्षात, FY23 मध्ये सुद्धा कंपनीने 25 रुपये लाभांश दिला होता. तर त्यापूर्वी कंपनीने तीन आर्थिक वर्षांत प्रत्येकी 15 रुपयांचा लाभांश दिला होता.

काय काम करते कंपनी?

Elcid Investment, RBI अंतर्गत गुंतवणूक श्रेणीतील एक नोंदणीकृत गैर बॅकिंग वित्तपुरवठा कंपनी आहे. कंपनीच्या कमाईतील मुख्य स्त्रोत हा त्यांच्या होल्डिंग कंपन्यांकडून मिळणारा लाभांश आहे. Elcid investment ने एशियन पेंट्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीकडे पेंट कंपनीत 8500 कोटी म्हणजे 2.95 टक्के वाटा आहे. कंपनीकडे 200,000 शेअर आहेत. त्यातील 150,000 शेअर प्रमोटरोकडे आहेत.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.