Sachin Tendulkar : क्रिकेटमधील देवाला हा शेअर पावला, असे केले मालामाल, मास्टर ब्लास्टरवर कोट्यवधींचा पाऊस पडला

Sachin Tendulkar Huge Profit : किक्रेटमधील दिग्गज खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने मैदान गाजवल्यानंतर उद्योग-व्यवसायात पण जम बसवला आहे. या कंपनीत केलेली गुंतवणूक त्याला फायदेशीर ठरली आहे. या कंपनीचा शेअर वधारल्याने त्याचे 5 कोटींचे 72 कोटी झाले आहे.

Sachin Tendulkar : क्रिकेटमधील देवाला हा शेअर पावला, असे केले मालामाल, मास्टर ब्लास्टरवर कोट्यवधींचा पाऊस पडला
सचिन तेंडूलकर
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 9:36 AM

शेअर बाजारात अनेकांचं नशीब पालटते. क्रिकेटच्या पिचवर दमदार कामगिरी करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याला शेअर बाजार पावला आहे. आझाद इंजिनियरिंग या कंपनीत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीचे शेअर सोमवारी 13 टक्क्यांनी वधारला होता. 31 ऑक्टोबर रोजी हा शेअर सकाळी 1412.75 रुपयांवर होता. तो 6 नोव्हेंबर रोजी बाजार बंद होताना 1683 रुपयांवर पोहचला. आजही या शेअरमध्ये उसळी येण्याची शक्यता आहे. या कंपनीला 700 कोटींची ऑर्डर मिळाल्याने कंपनीचा शेअर तेजीत आला आहे.

शेअरमध्ये 13 टक्क्यांची वाढ

आझाद इंजिनिअरिंग या कंपनीच्या शेअरमध्ये 13 ते 14 टक्क्यांची वाढ झाली. या कंपनीच्या शेअरचे मूल्य 1670.25 रुपयांपर्यंत पोहचले आहे. या कंपनीचा एक मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीरज लिमिटेड या जपानी कंपनीशी मोठा करार केला आहे. त्यामुळेच या कंपनीच्या शेअरने मोठी उसळी घेतली. Azad Engineering कंपनीने मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीसी लाँग टर्म काँन्ट्रॅक्ट अँड प्राईस करार केला आहे. त्यावर हस्ताक्षर केले आहे.

हे सुद्धा वाचा

आज सकाळच्या सत्रात हा शेअर 1.36 टक्क्यांनी वधारला. आज आझाद इंजिनिअरिंगचा शेअर 1700 रुपयांवर पोहचला. गेल्या 52 आठवड्यात या शेअरचा उच्चांक 2,080 रुपयांवर पोहचला. तर 52 आठवड्यातील या शेअरची निच्चांकी कामगिरी 642.40 रुपये इतकी होती. गेल्यावेळी हा शेअर 1680 रुपयांवर बंद झाला होता. तर अवघ्या चार दिवसात 200 रुपयांहून किंमत वाढली.

काय करते ही कंपनी

आझाद इंजिनिअरिंग ही खास क्षेत्रात काम करते. ही विमानासाठी टर्बाइन आणि पार्ट्स तयार करते. सध्या ही कंपनी एअरोस्पेस आणि संरक्षण, ऊर्जा, इंधन आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात काम करते. ही जगभरात ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्यफॅक्चरर्सचा (OME) पुरवठा करते. अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी जनरल इलेक्ट्रिक जीई (GE), हनीवेल इंटरनॅशनल, जपानची मित्सुबिशी हॅवी इंडस्ट्रीज, बहुराष्ट्रीय कंपनी सिमेन्स एनर्जी, ईटन एअरोस्पेस, मॅन एनर्जी सोल्यूशन्स यासारख्या कंपन्या, आझाद इंजिनिअरिंगच्या ग्राहक आहेत.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात
सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात.
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी.
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?.
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?.
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.