AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानी यांच्यांमुळे ब्रिटनने भारताला मागे टाकले? नेमका काय झाला प्रकार?

भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळे ब्रिटन पुढे आला आहे. ब्रिटन भारताला मागे टाकत जगातील सहाव्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट बनला आहे.

अदानी यांच्यांमुळे ब्रिटनने भारताला मागे टाकले? नेमका काय झाला प्रकार?
| Updated on: Feb 23, 2023 | 3:59 PM
Share

नवी दिल्ली : मागील महिन्याभरात जगभरातील (Share Markets) शेअर बाजारात घसरण झाली आहे. परंतु भारतीय शेयर बाजारातील घसरण (Indian Stock Market) सर्वाधिक आहे. अमेरिकन फेड रिजर्व्ह (US Fed) बँकेतर्फे पुन्हा एकदा व्याजदर कपातीचे संकेत आहे. यानंतर अमेरिकन शेअर बाजारात (US Market) जोरदार विक्री होत आहे. त्याचा परिणाम गुरुवारी भारतीय शेअर बाजारावरही झाला. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेंसेक्स(Sensex) 60,000 खाली आला आहे. निफ्टीही ऑक्टोंबर 2022 सर्वाधिक खाली आला आहे.

सेंसेक्स अन् निफ्टीत 1.5 टक्के घसरण झाली आहे. मागील चार दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात होणाऱ्या घसरणीचा फायदा ब्रिटेनला झाला आहे. ब्रिटनचे मार्केट कॅपिलाइजेशन (MCap) भारताच्या पुढे गेले आहे.

नऊ महिन्यानंतर यश

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळे ब्रिटन पुढे आला आहे. ब्रिटन भारताला मागे टाकत जगातील सहाव्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट बनला आहे. 29 मे 2022 रोजी म्हणजे सुमारे 9 महिन्यांनंतर प्रथमच ब्रिटनने या बाबतीत भारताला मागे टाकण्यात यश मिळविले आहे. मंगळवारी ब्रिटनच्या प्राथमिक सूचीचे एकत्रित मार्केट कॅप $ 3.11 ट्रिलियन पर्यंत वाढले होते. जे भारतापेक्षा $5.1 बिलियन अधिक आहे.

का होते ब्रिटनमध्ये गुंतवणूक

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ब्रिटिश चलन पौंड कमकुवत झाल्यामुळे ब्रिटनचा शेअर बाजार गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात अधिक यशस्वी ठरत आहे. त्यामुळे ब्रिटनचा शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी अधिक कमाईचे कारण बनत आहे. स्मॉल आणि मिड-कॅप कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. ब्रिटनचा FTSE 350 निर्देशांक यावर्षी 5.9 टक्क्यांनी वाढला आहे. ब्लू चिप FTSE 100 ने गेल्या आठवड्यात प्रथमच 8,000 चा टप्पा ओलांडला.

अदानी यांच्या शेअरमधील घसरणीचा फटका

24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित झाल्यापासून अदानी समूहाचे शेअर्स कमालीचे घसरले आहेत, ज्यामुळे समूहाचे मार्केट कॅप $142 अब्जांनी कमी झाले आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांची चिंता वाढली असून ते भारतीय बाजारपेठेत गुंतवणुकीबाबत सावध होत आहेत. मात्र, सध्या चिंतेचे ढग केवळ अदानी समूहापुरतेच मर्यादित असल्याचे दिसत आहे. सध्या इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही.

काय आहे हिंडनबर्ग

हिंडनबर्ग रिसर्चने जगभरातील अनेक कंपन्यांचा भांडाफोड केला आहे. या संशोधन संस्थेची स्थापना नाथन एंडरसनने (Nathan Anderson) 2017 मध्ये केली होती. ही एक आर्थिक संशोधन करणारी संस्था (Financial Research Firm) आहे.

इक्विटी, क्रेडिट आणि डेरिवेटिव्हसचे विश्लेषण, संशोधन करुन ही संस्था अहवाल तयार करते. या संस्थेचे नाव ठेवण्यामागेही रंजक इतिहास आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीमधील मॅचेस्टर टाऊनशिप जवळ एक विमान दुर्घटना झाली होती. 1937 मध्ये हिंडनबर्ग एअरशिपचा अपघात झाला होता. त्यावरुन या फर्मचे नाव ठेवण्यात आले आहे.

नाथन एंडरसन यांनी इस्त्राईलमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यात पदवी मिळवली आहे. त्यांनी डेटा कंपनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंकपासून आपल्या करियरला सुरुवात केली. हॅरी मार्कपोलोस हा त्याचा आदर्श आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.