Budget 2021 | समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : चंद्रकांत पाटील

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला.

Budget 2021 | समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : चंद्रकांत पाटील

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटवर भारतीय जनता पक्षाचे महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकप्ल समाजातील सर्व घटकांना दिलासा देणार असल्याचं मत चंद्रकांत पाटील यांनी नोंदवलं आहे. (Chandrakant Patil on Budget 2021)

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाच्या महासाथीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडला असून त्याबद्दल पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मी अभिनंदन करतो. कोरोनाच्या महासाथीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरभक्कम तरतूद केली आहे. त्याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडून गतीने आर्थिक विकास होण्यासाठीही या अर्थसंकल्पात विचार केला आहे. देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व घटकांना दिलासा मिळणार आहे. नाशिक मेट्रो व नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने चांगली आर्थिक तरतूद केली आहे. त्याबद्दल सरकारचे आभार. (Budget 2021 : Budget gives relief to every part of the society : Chandrakant Patil)

पाटील म्हणाले की, लघू उद्योगांना चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला अधिक चालना मिळेल. 75 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आयकर रिटर्न भरण्यापासून सवलत देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या विविध तरतुदींमुळे मध्यमवर्गीयांना विशेष दिलासा मिळेल. तसेच शेतकरी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठीची तरतूद 30,000 कोटींवरून वाढवून 40,000 कोटी रुपये केली आहे. सूक्ष्म सिंचनासाठीची तरतूद दुप्पट केली आहे. शेतीसाठीच्या कर्जपुरवठ्याची मर्यादा वाढवून 16.5 लाख कोटी रुपये केली आहे. ग्रामीण भागातील प्रॉपर्टीची मालकी स्पष्ट करणारी स्वामित्व योजना देशभर लागू केली आहे.

पाटील म्हणाले की, पिकांच्या बाबतीत मूल्यवर्धन व निर्यातीसाठीची ‘ऑपरेशन ग्रीन स्कीम’ योजनेचा विस्तार करून ती आता 22 पिकांना लागू केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पायाभूत सुविधांमध्ये वाढ करता यावी यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. शेतकऱ्यांसोबतच अनुसूचित जाती-जमाती अशा सर्व घटकांचा या अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. तसेच गहू, तांदूळ, डाळी, कापूस यांच्या खरेदीसाठी मोदी सरकारने किती मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला याची सविस्तर आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिली. एमएसपीच्या आधारे धान्य खरेदीबाबत मोदी सरकार किती चांगल्या रितीने काम करत आहे, हे यावरून स्पष्ट होते.

हेही वाचा

डिजीटल जनगणनेत ओबीसींचीही जनगणना करा : छगन भुजबळ

Budget 2021 : आता स्मार्टफोन्स महागणार! मोबाईल पार्ट्सबाबत सरकारची मोठी घोषणा

कोरोना संकटातही देशाला नवउभारी देणारा अर्थसंकल्प, देवेंद्र फडणवीसांकडून केंद्राचं अभिनंदन

(Budget 2021 : Budget gives relief to every part of the society : Chandrakant Patil)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI