
नवी दिल्ली | 23 January 2024 : आयकर आणि जीएसटीचे मासिक कर संकलन वाढणार आहे. त्यामुळे वित्तीय तूट कमी होण्याचा अंदाज आहे. सरकार आर्थिक आघाडीवर सक्षम होत असल्याने सामाजिक योजनांवर अधिक पैसा खर्च करु शकते. समाजातील गरीब, दुर्बल घटक आणि शेतकऱ्यांसाठी कल्याण योजनांवर अधिक पैसा खर्च करण्यात येऊ शकतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार अंतरिम बजेटमध्ये काही तरतूद करु शकते. त्यामुळे मनरेगा, ग्रामीण रस्ते, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणि पीएम विश्वकर्मा योजनांसाठी अधिक निधी खर्च केल्या जाऊ शकतो. तर मजूरी पण वाढविण्यात येऊ शकते.
सामाजिक योजनांसाठी तरतूद
सरकार दरवर्षी वित्तीय तोटा कमी करण्यावर भर देत आहे. तसेच अनावश्यक खर्चांना कात्री लावत आहे. केंद्राची आर्थिक क्षमता वाढल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार सामाजिक योजनांसाठी मोठ्या निधीची तरतूद करु शकते. चालू आर्थिक वर्षात सरकारच्या बजेटचा आकार 40 लाख कोटींच्या घरात होता. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये त्यात 10 टक्के वाढ होऊन तो 43-44 लाख कोटींपर्यंत वाढू शकतो. महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी अधिक निधीची तरतूद होऊ शकते.
सरकारच्या तिजोरीत आवक
कर संकलनात अशी झाली वाढ