Budget Loan EMI | कमी होणार आहे तुमच्या कर्जाचा हप्ता, बजेटमध्ये मिळाले की संकेत

Budget Loan EMI | आता तुम्ही म्हणाल, गृह कर्जाचा हप्ता कमी करण्याविषयी तर काही घोषणा झाली नाही, बजेटमध्ये, मग ईएमआय कमी करण्याचा दावा कसा करण्यात येत आहे, नाही का? तर यामागे काही आकडेमोड आहे. त्यावर नजर टाकली तर कदाचित गृह कर्जाचा हप्ता कसा कमी होईल, हे समोर येईल.

Budget Loan EMI | कमी होणार आहे तुमच्या कर्जाचा हप्ता, बजेटमध्ये मिळाले की संकेत
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 2:35 PM

नवी दिल्ली | 2 February 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केले. बजेट भाषणात वित्तीय तूट, सरकारी कर्ज आणि भांडवली खर्च असे शब्द तुम्ही ऐकले असेल. यामधील आकडेवारी सकारात्मक आहे. तर पायाभूत सुविधांवर सरकार फोकस करत आहे. यामुळे लवकरच व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 साठी वित्तीय तूट कमी करुन 5.1 टक्के ठेवण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. सध्याच्या आर्थिक वर्षासाठी 5.9 टक्क्यांहून हा आकडा 5.8 करण्याचा प्रयत्न आहे. अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात जागतिक पतमानांकन (रेटिंग)संस्थांनी पण वित्तीय तोटा भरुन काढण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

किती आहे वित्तीय तूट

देशाची वित्तीय तूट 17 लाख 34 हजार 773 कोटी रुपये आहे. या आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये तो कमी होऊन 16 लाख 85 हजार 494 कोटी रुपये करण्याचे लक्ष ठेवले आहे. बजेटच्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सरकारी उधारी कमी करण्यावर जोर दिला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेत पुढील आर्थिक वर्षात वित्तीय तूट कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. येत्या काळात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कर सकंलन वाढल्याने, बँका आणि आर्थिक संस्थांकडून होणाऱ्या फायद्याच्या आधारे वित्तीय तूट भरुन काढण्यात येणार आहे. जागतिक पतमानांकन संस्था फीच, एसअँडपी, मूडीजने भारताला अनुकूल रेटिंग दिले आहे.

हे सुद्धा वाचा

ईएमआय असा होईल कमी?

  • रेटिंग एजन्सी क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी. के. जोशी यांच्यानुसार, भारताच्या वित्तीय तूटीकडे जगाचे लक्ष लागेल आहे. वित्तीय तूट कमी होणे हे अनुकूल संकेत आहेत. त्यामुळे देशात महागाई कमी होण्यास मदत होईल. रिझर्व्ह बँकेवरील ताण कमी होईल. आरबीआयवर महागाई दर 2 ते 6 टक्क्यांदरम्यान ठेवण्याची जबाबदारी आहे. महागाई कमी झाल्यास आरबीआयवरील ताण कमी होईल. रेपो दर 6.5 टक्क्यांहून कमी होईल. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 5.69 टक्क्यांवर होता. रेपो दर कमी झाल्यास ईएमआय कमी होईल.
  • आरबीआयने गेल्या एप्रिल 2023 पासून रेपो दर जैसे थे ठेवले आहेत. ही ग्राहकांसाठी तात्पुरती मलम पट्टी ठरील आहे. कारण ग्राहकांना अगोदरच वाढीव व्याजदराने ईएमआय भरावा लागत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेट 6.5 टक्के होता. तेव्हापासून रेपो दरात बदल झालेला नाही. रेपो दरात कपात न झाल्याने व्याजदर वाढला आहे. त्याचा फटका बसला आहे.
Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.