Cairn Energy ने एअर इंडियाला कोर्टात खेचलं, विमान वाचवण्यासाठी फक्त इतका वेळ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Updated on: Jun 21, 2021 | 3:32 AM

ब्रिटेनची इंधन कंपनी केयर्न एनर्जी (Cairn Energy) भारत सरकारची विमान कंपनी एअर इंडियाच्या विमानावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच भाग म्हणून केयर्न कंपनीने एअर इंडियाला (Air India) अमेरिकेतील कोर्टात खेचलंय.

Cairn Energy ने एअर इंडियाला कोर्टात खेचलं, विमान वाचवण्यासाठी फक्त इतका वेळ

वॉशिंग्टन : ब्रिटेनची इंधन कंपनी केयर्न एनर्जी (Cairn Energy) भारत सरकारची विमान कंपनी एअर इंडियाच्या विमानावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच भाग म्हणून केयर्न कंपनीने एअर इंडियाला (Air India) अमेरिकेतील कोर्टात खेचलंय. केयर्नने भारत सरकारकडून 1.2 अब्ज डॉलर रक्कम वसूल करण्यासाठी ही रणनीती आखली आहे. त्यामुळे आता एअर इंडियाला आपली विमानं वाचवण्यासाठी केवळ जुलै मध्यापर्यंतचा वेळ आहे (Cairn Energy petition in America court against Air India for payment).

केयर्न एनर्जीने दाखल केलेल्या याचिकेला आव्हान देण्यासाठी एअर इंडियाला जुलैपर्यंतचा अवधी आहे. केयर्नने अमेरिकेच्या केंद्रीय न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेत म्हटलं आहे, “एअर इंडियावर (Air India) भारत सरकारची मालकी आहे. त्यामुळे एअर इंडियावर असलेलं 1.26 बिलियन डॉलरची रक्कम भारत सरकारने द्यावी.”

भारत सरकारकडून Cairn energy च्या अशाप्रकारच्या पावलाचा विरोध

केयर्नने आरोप केलाय की, भारत सरकारने 4 वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत मध्यस्थतेची कार्यवाहीत सहभाग घेऊनही ही रक्कम दिलेली नाही. त्यामुळेच केयर्न (Cairn energy) या निर्णयानुसार एअर इंडियासारख्या (Air India) सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडून वसुली करेल.” दुसरीकडे भारत सरकारने Cairn energy च्या अशाप्रकारच्या कोणत्याही पावलाचा विरोध करण्याची भूमिका घेतलीय.

“केयर्न एनर्जी वादाचा एअर इंडियाच्या खासगीकरणावर परिणाम नाही”

अमेरिकेच्या न्यायालयाने भारत सरकारला कंपनीचे विकलेले शेअर, जप्त केलेला लाभांश आणि कर परतावा परत करण्यास सांगितलं होतं. या प्रकरणात भारताकडूनही एक न्यायाधीश नियुक्त करण्यात आले होते. DIPAM च्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, केयर्न एनर्जी वादाचा एअर इंडियाच्या खासगीकरणावर (Air India Privatization) कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. केयर्न एनर्जी (Cairn Energy) भारत सरकारवर दबाव आणण्यासाठी असं करत आहे. केयर्न कंपनीला भारत सरकारने आर्बिट्रेशन पॅनलविरोधातील याचिका मागे घ्यावी असं वाटतंय.

हेही वाचा :

318 ऑक्सिजन कंसंट्रेटर काही तासांत भारतात येणार; अमेरिकतून विमान निघालं

एकेकाळी Air India मध्ये ट्रेनी, आता एयरलाईन्स खरेदी करण्याची तयारी, पाहा कोण आहे मीनाक्षी!

आता हाफ तिकीट विमानप्रवास, एअर इंडियाचं ज्येष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट

व्हिडीओ पाहा :

Cairn Energy petition in America court against Air India for payment

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI